Headlines

फोनमधील महत्वाचा Data Leak होण्याची भीती वाटतेय ? या चुका टाळा, डिव्हाइस राहील नेहमी सेफ

[ad_1]

नवी दिल्ली:Data Leak : डेटा लीक झाल्याची तक्रर आजकाल अनेक युजर्स करतात. महत्वाचे म्हणजे त्यांचा महत्वाचा डेटा इतरांपर्यंत कसा आणि कधी पोहोचला हे युजर्सना कळत सुद्धा नाही. स्मार्टफोन वापरताना केलेला थोडा निष्काळजीपण पुढे मोठे नुकसान करू शकतो. लीकमध्ये खाजगी फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही गोपनीय फाइल देखील सुद्धा चुकीच्या व्यक्तीच्या हाती जाऊ शकतात आणि एखाद्याला आयुष्यभर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. डेटा लीक झाल्यानंतर वैयक्तिक माहिती आणि ई-मेल आयडी, पासवर्ड, मोबाइल नंबर इत्यादी हॅकर्सपर्यंत पोहोचतात. याच्या मदतीने वैयक्तिक ब्लॅकमेलही करता येते. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

वाचा: Google Search 2022: Brahmastra ते IPL, या वर्षी भारतीयांनी हे टॉपिक्स केले सर्वाधिक सर्च

अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

फोनवरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. हॅकर्स किंवा स्कॅमर अनेकदा ईमेल किंवा एसएमएसद्वारे मालवेअरने भरलेल्या लिंक्स पाठवतात. लिंक क्लिक करताच तुमच्या डिव्हाईसचे नियंत्रण हॅकर्सकडे जाऊ शकते. वैयक्तिक फोटो, व्हिडिओ किंवा फाइल्स आणि पासवर्ड मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करता असाल तर अलर्ट राहा . जर त्यांनी तुमचा डेटा आणखी एखाद्या व्यक्तीकडे हस्तांतरित केला तर, तुमचा डेटा लीक होऊ शकतो.

वाचा: Reliance Jio युजर्सची मजा, डेटा संपण्याचे नाही टेन्शन, कंपनीने लाँच केला नवा प्लान

बर्‍याच वेळा घाईघाईने किंवा लक्ष न देता प्रामाणिक स्त्रोतांकडून Third Party Apps Install करण्याच्या चुका देखील अनेक जण करतात. हे अॅप्स स्पायवेअरने लोड केले जाऊ शकतात आणि तुमची वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या समोर आणू शकतात.

डेटा लीक टाळण्यासाठी या पद्धती फॉलो करा:

स्मार्टफोनला डेटा लीकपासून वाचविण्यासाठी फोन लॉक ठेवा. यासोबतच अॅपलॉकच्या मदतीने फोनमधील Apps विशेषतः गॅलरी आणि File Manager सुरक्षित ठेवा. आजकाल अनेक स्मार्टफोन कंपन्यां प्री-इंस्टॉल App Lock ची सुविधा देतात. त्याच्या मदतीने तुम्ही मोबाइल अॅप लॉक करून सुरक्षितही करू शकता.

वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका:

तुमचा वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियावरही तुमचे वैयक्तिक फोटो आणि फाइल्स कोणाशीही शेअर करू नका. तसेच, Third Party Apps वापरणे टाळा. अॅप फक्त Google Play Store वरून इंस्टॉल करा.

वाचा: Top Smartphones: या वर्षी लाँच झालेल्या ५ फ्लॅगशिप स्मार्टफोन्सने मार्केटमध्ये धुमाकूळ घातला

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *