Headlines

प्रसिद्ध मराठी चित्रपटातील ‘तो’ क्लायमॅक्स केलाय शाहरुच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!

[ad_1]

Mahesh Manjrekar On Shah Rukh Jawan : प्रसिद्ध हास्यकलावंत भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचं नाटक ‘करून गेलो गाव’ (Karun gelo gava) सध्या चर्चेत आहे. येत्या 15 ऑक्टोबरला या नाटकाचा 100 वा शो पार पडला. या निमित्ताने या नाटकाच्या टीमने झी 24 ताससोबत गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी  अनेक राजकीय, मनोरंजन अशा अनेक मुद्द्यांना हात घातला. मांजरेकर यांनी शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) नुकत्याच रिलीज झालेल्या जवानच्या चित्रपटावर देखील वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे सध्या चित्रपटसृष्टीत खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

नेमकं काय म्हणाले Mahesh Manjrekar ?

आज प्रत्येक नागरिकाने राजकीयदृष्ट्या जागृक असणं गरजेचं आहे. मी शिवाजी राजे भोसले सिनेमा केला, तेव्हा माझा क्लायमॅक्स देखील तोच होता. अनेकजण म्हणतात, आमचा आमदार असा आहे, तसा आहे. पण तो तुम्हीच निवडून दिलात ना? त्यामुळे नंतर शिव्या देण्यात काहीही अर्थ नाही. मला एकजण म्हटला की, आम्ही वोट देत नाही. मग तुम्ही आमदारांना दोष कसं काय देता? मला कोणतरी म्हटलं की, जवानमध्ये देखील तोच क्लायमॅक्स केलाय, जो शिवाजीराजे भोसलेचा आहे. सेम टू सेम… जसाच उचलून त्यांनी इथं लावलेला आहे. माझा सचिनचं जे भाषण होतं. जसंच्या तसं इथं आहे. मी तो सिनेमा पाहिलेला नाही. पण मला असं कोणीतरी म्हटलं… मला ते खूप चांगलं देखील वाटलं. मला फक्त एवढंच वाटतं की, प्रत्येकाने राजकीयदृष्ट्या जागृक असावं, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी कोकणाच्या रस्त्यावर देखील खडेबोल सुनावले.

मला कोकणाबद्दल प्रचंड प्रेम आहे. कोकणाला एवढा मोठा समुद्रकिनारा आहे. मला जगातील सर्वात सुंदर ठिकाण कोकण वाटतं. पण कोकणाचा रस्ता म्हणजे बाकींच्यासाठी प्रॅक्टिस ग्राऊंड आहे. असा रस्ता बनवायचा नाही, हे त्याचं उदाहरण इंजिनियर्ससाठी आहे. चौपदरीकरण नाही झालं असतं तर बरं झालं असतं की, असं महेश मांजरेकर म्हणाले आहेत. 

पाहा Video

दरम्यान, भ्रष्टाचार आणि समाज या विषयावर भाष्य करणारा शाहरूखचा जवान सिनेमा प्रचंड गाजला. हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. रिलीजच्या 24 दिवसांत जगभरात या सिनेमाने 1055 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे अजूनही बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चा बोलबाला चालत असल्याचं पहायला मिळतंय.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *