Headlines

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याने आई-वडिलांना दिली खास भेट, व्हिडीओ केला शेअर

[ad_1]

Santosh Juvekar Gifted A Car To Parents : मराठमोळ्या संतोष जुवेकरला आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाते. ‘मोरया’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या अनेक चित्रपटात दमदार अभिनय साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिकंली. संतोषनं मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर एक वेगळी छाप उमटवली आहे. मराठीसह हिंदीतील बऱ्याच चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही तो झळकला. आता संतोष जुवेकरने त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. 

संतोष जुवेकरने आई-वडिलांना दिली नवी गाडी

संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत एक गुडन्यूज  दिली आहे. संतोषने एक नवी गाडी खरेदी केली आहे. त्याने त्याच्या आई-वडिलांना ही नवीन गाडी भेट दिली आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

संतोषने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याचे आई-बाबा गाडीसमोर उभे असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर संतोष हा आईला गाडीवरचा कपडा काढ, असे सांगतो. त्याचे आई-बाबा या गाडीवरचा कपडा बाजूला सरकवताना दिसत आहेत. या व्हिडीओत संतोष हा आईबाबांसाठी नवीन गाडी आली आहे, असे म्हणतो. त्यावर संतोषचे बाबा आता ही गाडी माझ्या आयुष्याला पुरेल असं म्हणतात. तर त्याची आई माझ्या लेकाने गाडी घेऊन दिली, असे म्हणते. 

व्हिडीओही केला शेअर

त्यावर संतोष जुवेकर आई तू आहेस तर 15 गाड्या येतील. त्यानंतर संतोष हा व्हिडीओ आई बाबांचा आनंद टिपण्याचा प्रयत्न करतो. संतोषने हा व्हिडीओ शेअर करताना त्या हटके कॅप्शनही दिले आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं, काय असत पुण्य की जे ह्यांच्या डोळ्यात दिसतं. आई बाबा आय लव्ह यू.’ असे संतोष जुवेकरने म्हटले आहे. 

संतोषच्या या व्हिडीओवर त्याचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी संतोषला नवीन गाडी घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर संतोषनेही चाहत्यांचे आभार मानले आहेत. तर अभिनेता कुशल बद्रिकेने वॉव असे म्हणत यावर कमेंट केली आहे. तर एकाने संतोष आई बाबांना गाडी घेऊन दिलीस खूप भारी वाटलं जसे तुझा आई बाबांचे आशीर्वाद तुझा पाठीशी आहेत तसेच माझे ही माझा favorite actor आहेस तू अशीच कायम तुझी प्रगती होत राहो हीच माझी इच्छा आहे, असे म्हटले आहे.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *