Headlines

फक्त विनोदच नाही तर, Bharti Singh ‘या’ कामानेही कमवते पैसे

[ad_1]

मुंबई : कॉमेडी क्विन भारती सिंग (Bharti Singh ) सध्याची आघाडीची विनोदवीर आहे. पण यासाठी भारतीने अनेक खस्ते खाल्ले आहेत. भारतीने करियरची सुरुवात ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोच्या माध्यमातून केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. भारतीने लल्ली भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. (bharti singh weight loss) चाहत्यांनी देखील भारतीला प्रचंड प्रेम दिलं आणि आजही देत आहेत. 

सर्वांना पोट धरुन हसायला लावणारी भारती फक्त विनोद करून पैसे कमावत नाही तर, आणखी अनेक मार्ग आहेत. ज्यामुळे अभिनेत्री तगडी कमाई करते. भारती सिंग आज लक्झरी जीवनशैली जगत आहे, ज्यामागे तिची मेहनत आहे.

कॉमेडी व्यतिरिक्त भारती सिंग साइड बिझनेस देखील करते. भारतीचा पंजाबमध्ये KELEBY नावाचा मिनरल वॉटर कारखानाही आहे. भारतीने एकदा तिच्या व्लॉगमध्ये कारखान्याबद्दल सांगितलं होतं. भारतीच्या कारखान्यात आजूबाजूच्या गावातील लोक काम करतात.

भारती सिंहचा जन्म अमृतसरमध्येच झाला होता. आपल्या भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने भारतीला प्रचंड आनंद आहे. या कारखान्यातून भारती तगडी कमाई करते. 

भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंट आणि इंस्टाग्राम वरूनही दोघे भरपूर कमाई करतात.

2019 मध्ये फोर्ब्सच्या (Forbes) 100 सेलिब्रिटींच्या यादीत भारतीचे नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेत्रीचा 82 वा क्रमांक होता. तेव्हा भारतीची कमाई 10.92 कोटी इतकी होती. (Bharti Singh earning source)

भारतीने तिच्या करियरची सुरुवात  ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ (The Great Indian Laughter Challenge) शोच्या माध्यमातून केली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. भारती छोट्या पडद्यावर फक्त  रिएलिटी शो देखील होस्ट करते. शोच्या एका एपिसोडसाठी अभिनेत्री जवळपास  5 लाख रुपये मानधन घेते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *