Headlines

Face Off: ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर Malaika Arora ला टक्कर देणार Nora Fatehi, पाहा Video

[ad_1]

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही बॉलिवूडची ‘छैय्या छैय्या’ गर्ल म्हणून ओळखली जाते. मलायका सध्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ (Moving In With Malaika) या शोमुळे चर्चेत आहे. सुरुवातीपासून अनेकांनी मलायका आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्यात तुलना केली. आता मलायका आणि नोरा या दोघांमध्ये छैय्या छैय्या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे. मलायका आणि नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

मलायका आणि नोराची डान्स स्किल तर प्रत्येकाला ठावूक आहे. त्यासोबत या दोघांचा बोल्ड लूक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओत मलायका आणि नोरानं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मलायका आणि नोराच्या डान्सचा हा व्हिडीओ डिस्नी प्लस हॉयस्टारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मलायका आणि नोराचा ड्रीम कोलॅब फक्त आणि फक्त मूव्हिंग इन विथ मलायकामध्ये पाहायला मिळणार आहे. 

मलायका अरोराच्या डान्सवर कमेंट करत नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलं की आम्हाला या दोघांना एकत्र पाहायला मिळणार म्हणजे डान्सचा तडका लागणार. दुसरा नेटकरी म्हणाला, या दोघांना एकत्र पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. अनेकांनी फक्त नोरासाठी कमेंट केल्या आहेत. 

करणनं अरबाज आणि जॉर्जिच्या ब्रेकअपवर विचारला मलायकाला प्रश्न –

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमध्ये दिग्दर्शक करण दिसला होता. यावेळी करणनं मलायकाला विचारलं, जेव्हा नुकताच अरबाज आणि जॉर्जियाचा ब्रेकअप झाला तेव्हा तू याविषयी त्याच्याशी चर्चा केलीस का? त्यावर उत्तर देत मलायका म्हणाली, मला अरबाज आणि जॉर्जिच्या ब्रेकअपच्या अफवांची खात्री नाही.’ (Arbaaz Khan and Giorgia Andriani Breakup)

हेही वाचा : Celebrity Sex Life: ‘या’ कलाकारांनी केला आवडत्या सेक्स पोजिशनचा खुलासा

मलायका पुढे म्हणाली, ‘खर सांगू तर, मी त्याला असे प्रश्न विचारत नाही. मला कोणाला त्यांच्या आयुष्याविषयी विचारायला आवडत नाही. मी अरहानला देखील विचारत नाही की त्याच्या आयुष्यात काय सुरु आहे? मला असं वाटतं की मी लाइन क्रॉस करत आहे. मला याची कल्पना आहे की असे बरेच कपल आहेत ज्यांना घटस्फोटानंतरही त्यांच्या मुलांकडून एकमेकांच्या आयुष्याबद्दल अपडेट मिळतात, पण मी त्यांच्यासारखी नाही. मी या सर्व गोष्टींपासून दूर राहते.’ 

मलायकाशी पुढे बोलताना करणनं विचारले की, विभक्त झाल्यानंतर तिचे अरबाजसोबत कोणते नाते आहे? याला उत्तर देत मलायका म्हणाली, ‘मला वाटतं की आमचं खूप चांगल जमत. आम्ही दोघे एकमेकांसोबत पूर्वीपेक्षा खूप चांगले राहतो.’ 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *