Headlines

EPFO धारकांना सरकार लवकरच देणार खुशखबर, 24 कोटी लोकांना होणार फायदा

[ad_1]

नवी दिल्ली : भारत सरकार लवकरच सुमारे 24 कोटी पीएफ (PF account Holder) धारकांना आनंदाची बातमी देणार आहे. सरकार लवकरच व्याजदरात वाढ करू शकते, अशी अपेक्षा आहे. 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील.

केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. ज्यांची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाचे व्याजदर ठरवले जाणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, ‘ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यामध्ये 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव सूचीबद्ध आहे.’

पत्रकारांच्या प्रश्नावर सीबीटी प्रमुखांनी ही माहिती दिली

EPFO 2020-21 प्रमाणे 2021-22 साठी 8.5% व्याजदर कायम ठेवेल का असे विचारले असता? पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूपेंद्र यादव हे सीबीटीचे प्रमुख आहेत.

गेल्या 10 वर्षांचा हा आकडा आहे

हे लक्षात घेण्यासारखे आहे की CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविला जातो. मार्च-2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2019-20 साठी 8.5% च्या 7 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणला होता.

2018-19 मध्ये 8.65% व्याज

2017-18 मध्ये 8.65% व्याज

2016-17 मध्ये 8.65% व्याज

2015-16 मध्ये 8.8% व्याज

2014-15 मध्ये 8.75% व्याज

2013-14 मध्ये 8.75% व्याज

2012-13 मध्ये 8.5% व्याज

2011-12 मध्ये 8.25% व्याज

अलीकडेच, EPFO ​​ने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आणखी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा केले आहे. संस्थेने ८.५ टक्के दराने व्याज दिले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *