Headlines

क्रिकेटच्या मैदानात जेव्हा फडकला तिरंगा; स्वातंत्र्यानंतरचे भावूक क्षण एकदा पाहाच

[ad_1]

मुंबई: 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा क्रिकेट इतके लोकप्रिय नव्हते. परंतु हळूहळू क्रिकेटने भारतीय जनमानसात आपले स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात वेस्ट इंडिजचा संघ क्रिकेटवर राज्य करत असे. त्याच्याकडे असे वेगवान गोलंदाज होते जे विरोधी संघाला टिकू देत नव्हते. पण भारतातील सुनील गावस्कर यांनी हा भ्रम मोडून काढत वेस्ट इंडिजच्या धाडसी गोलंदाजांना फटकारले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 चा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतात क्रिकेटमध्ये क्रांती झाली. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत भारतीय संघाने क्रिकेटच्या विश्वात कशाप्रकारे उंची गाठली. दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत भारतीय संघ आता क्रिकेटमधील महासत्ता बनला आहे.

वेस्ट इंडिजच्या मैदानात जिंकली पहिली सीरीज

70 आणि 80 च्या दशकात वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात धोकादायक संघ मानला जात होता. त्याला पराभूत करणे म्हणजे हिमालय पर्वताला नतमस्तक करण्यासारखे होते. 1971 मध्ये टीम इंडिया पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या मैदानात गेली. त्यावेळी टीम इंडियाचे कर्णधार अजित वाडेकर होते. त्यानंतर या दौऱ्यावर भारतीय संघाला सुनील गावस्करसारखा तगडा खेळाडू मिळाला. त्यावेळी भारताने 1-0 ने पहिली सीरीज जिंकली आणि सुनील गावस्कर या मालिकेतील विजयाचा हिरो ठरले. या खेळाडूने 774 धावा करून ‘मॅन ऑफ द सीरीज’ ठरले.  क्रिकेटमध्ये भारताच्या महान होण्याच्या पर्वा येथूनच सुरूवात केली. 

 भारताने 1983 चा विश्वचषक जिंकला 

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 चा विश्वचषक जिंकला. याआधी वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 चा विश्वचषक जिंकला होता. 1983 च्या विश्वचषकात कपिल देव यांनी 175 धावांची इनिंग खेळली होती. ॉ

भारतील क्रिकेटचा देव

क्रिकेट जगतातील प्रत्येक फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावायचे असते. त्यावेळी भारतील क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या विश्वात 100 शतके झळकावून सर्वांची मने जिंकली. सचिन तेंडुलकरला चाहते क्रिकेटचा देव मानतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटर आहे.    

– 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने पहिली कसोटी मालिका ऑस्ट्रेलियात खेळली. १९४८ मध्ये विजय हजारे एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले.

– 1955 मध्ये पॉली कसोटीत द्विशतक साजरे करणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले. भारताचा १९६८ मध्ये विदेश दौऱ्यात पहिला मालिका विजय

– 1983 मध्ये वनडेत शतक साजरे करणारे कपिलदेव पहिले भारतीय ठरले. त्यांची झिम्बाव्वे संघाविरुद्ध विश्वचषकात नाबाद १७५ धावांची खेळी

– 1988 मध्ये भारताच्या नरेंद्र हिरवानीने विंडीजविरुद्ध १३६ धावा देत १६ बळी घेतले. पदार्पणातील हा सर्वात्तम गोलंदाजीचा विक्रम आहे. कुंबळेच्या नावे १९९९ मध्ये एका डावात सर्व बळींची नोंद आहे.

– 2001 मध्ये सचिन वनडेत १० हजार धावा पुर्ण करणारा पहिला भारतीय. २००४ मध्ये सेहवाग कसोटीत पहिला त्रिशतकवीर भारतीय.

– 2007 मध्ये भारताने पहिल्यांदा आयोजित टी-२० वर्ल्डकप पटकावला. २०१० मध्ये सचिन वनडेत द्विशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

– 2011 मध्ये भारताने दुसऱ्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. २०१२ मध्ये सचिनने आपला शेवटचा वनडे खेळला. त्याच्या नावे ४६३ सामने, सर्वाधिक १८,४२६ धावा, सर्वाधिक ४९ शतके, २०१३ मध्ये खेळला २०० वी कसोटी

– 2014 मध्ये रोहितची वनडेत विश्वविक्रमी खेळ. श्रीलंकेविरुद्ध कोलकात्यात २६४ धावा काढल्या होत्या. 2019 मध्ये चहर टी-२० मध्ये हॅट्रीक करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी नोंदवली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *