Headlines

Election Commission freezes uddhav thackeray Shivsena Dhanushyaban symbol Anil Desai reacted on decision

[ad_1]

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा दिलेला हंगामी आदेश शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. आयोगाचा हा निर्णय अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया यावर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. हा निर्णय अनाकलनीय आहे. चिन्हाबाबत आयोगानं आधी बोलण्याची संधी द्यायला हवी, असे देसाई यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चिन्हाबाबतच्या पुढील लढाईची दिशा ठरवली जाईल. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख घेतील, असे देसाई यांनी सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेने बोगस शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. हा आरोप खोटा असल्याचे देसाई म्हणाले आहेत. ‘जिंकून दाखवणारचं’ असे म्हणत निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या आयोगाच्या निर्णयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास

निवडणूक आयोगाच्या कार्यालयात चार तास चाललेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेशही देण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्रिशुल, उगवता सूर्य, मशाल या चिन्हाबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *