Headlines

election commission decided to free bow and row symbol of shivsena parry shinde group bharat gogawale first comment prd 96

[ad_1]

भारतीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले असून आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. अंधेरी पूर्वी विधानसभा पोटनिवडणूक, महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर भरत गोगावले यांनी शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्हाला स्वीकारावा लागणार आहे. हा निर्णय दोघांनाही स्वीकारणे बंधनकारक आहे. त्यामुळे आगामी काळातील आमची रणनीती लवकरच ठरवू. हा निर्णय आमच्या बाजूने लागला असता तर आमच्यासाठी हा मोठा निर्णय असता. पुढे काय करता येईल याची आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्री, नेते, उपनेते एकत्र बसून यावर चर्चा करतील, असे भरत गोगावले म्हणाले आहेत.

निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना आगामी निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *