Headlines

Ekta Kapoor : “तुम्ही तरुणांची…”, सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारलं!

[ad_1]

Supreme Court on Ekta Kapoor : वेबसिरीज XXX मधील आक्षेपार्ह मजकूरासाठी सुप्रीम कोर्टाने प्रोड्यूसर एकता कपूरला (Ekta Kapoor) फटकारलं आहे. तुम्ही देशातील तरुण पिढीची मनं दुषित करत आहात, असं न्यायालयानं म्हटलं आहे. बेगुसरायच्या स्थानिक कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटला आव्हान देणार्‍या एकता कपूरच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही टिप्पणी केली. 

तुम्ही देशातील तरुण पिढीचं मनं भ्रष्ट करत आहात. आता यावर काहीतरी केलं पाहिजे. OTT कन्टेंन्ट सर्वत्र उपलब्ध आहे. प्रश्न असा आहे की, तुम्ही लोकांना कोणत्या प्रकारची कन्टेंन्ट पुरवत आहात, असं न्यायलयाने (Supreme Court on Ekta Kapoor) म्हटलं आहे.

एका माजी सैनिकाने XXX वेबसिरीजद्वारे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याबद्दल न्यायालयात तक्रार केली होती, ज्यावर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सीटी रवी कुमार यांच्या खंडपीठाने एकता कपूरला फटकारलं.

एकता कपूरने (Ekta Kapoor)  थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी एकता कपूरची बाजू मांडताना वॉरंटविरोधात हायकोर्टात (High Court) याचिकाही दाखल केली आहे, असा युक्तिवाद केला. मात्र लवकरच सुनावणी होण्याची आशा नाही, त्यामुळे ही पद्धत योग्य नसल्याचं न्यायालयानं सांगितलं.

आणखी वाचा – नोराचा अजबच तोरा!बिचवर केला तुफान डान्स, पाहा VIDEO

मात्र, एकता कपूरच्या (Ekta Kapoor)  याचिकेवर कोणताही आदेश देण्याऐवजी न्यायालयाने ती याचिका प्रलंबित ठेवली आहे. उच्च न्यायालयातील सुनावणीची स्थिती जाणून घेण्यासाठी स्थानिक वकिलाची मदत घेणे योग्य ठरेल, असा सल्ला न्यायालयाने एकता कपूरला दिला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *