Headlines

एकनाथ शिंदेंच्या खासगी सचिवांशी खरंच वाद झाला? अब्दुल सत्तार यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी फक्त…” | abdul sattar clarification on clash with eknath shinde secretary

[ad_1]

विकासकामांच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील नेते तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात वाद झाल्याचे म्हटले जात आहे. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच झाल्याचा दावा करण्यात येतोय. सत्तार आणि शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यातील कथित वादानंतर उद्धव ठाकरे समर्थकांनी सत्तार यांच्यावर टीका केली आहे. अब्दुल सत्तार हे विकृत आहेत. ते कोठेही गेले तरी असेच वागणार आहेत, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. दरम्यान, या कथित वादावर आता खुद्द सत्तार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात कोणताही वाद झालेला नाही. आचारसंहितेच्या अगोदर विकासकामे व्हायला हवीत, अशी भूमिका मी मांडली होती, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >> “अब्दुल सत्तार हे विकृत, कोठेही गेले तरी..,” ‘त्या’ कथित वादावर बोलताना अंबादास दानवेंचे टीकास्त्र

शिवीगाळ वगैरे काहीही झालेली नाही. काही अडचणी असतील तर त्या सांगाव्यात, असे या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानंतर माझ्यासह सर्वच आमदारांनी त्या बैठकीत आपल्या अडचणी सांगितल्या होत्या. सध्या चुकीचे वृत्त दिले जात आहेत. आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश नंतर एकनाथ शिंदे यांनी दिले, असे सत्तार यांनी सांगितले.

हेही वाचा >> अतुल भातखळकर यांचे आक्षेपार्ह ट्वीट, मुलायमसिंह यादव यांचे नाव घेत म्हणाले; “कारसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या…”

मी ४२ वर्षांपासून राजकारणात आहे. कोणाला शिवीगाळ कशी करेल. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हे क्लासवन अधिकारी आहेत. त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच नाही. मी फक्त पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे विकासाची कामे लवकरात लवकर करा. आचारसंहिता लागली तर मंजूर झालेला निधीही वापरता येणार नाही, असे मी म्हणालो. या चर्चेशिवाय काहीही झालेले नाही, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले.

हेही वाचा >> अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उतरण्याची शिंदे गटाची तयारी, अरविंद सावंत म्हणाले “भाजपाने आग…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही याबाबत विचारू शकता. मी संतप्त होऊन बाहेर पडलो नाही. माझ्याअगोदर शंभुराजे देसाई, गुलाबराव पाटील बैठकीमधूमन बाहेर पडले. त्यानंतर मी या बैठकीच्या बाहेर पडलो, असेही अब्दुल सत्तार यांनी सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *