Headlines

Eknath Shinde group spokeperson Naresh Mhaske Criticized uddhav thackeray after election commission order on election symbol

[ad_1]

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठविण्याचे ४० खोकासुरांच्या रावणाचे हे काम म्हणजे आईच्या काळजात कट्यार घुसविण्यासारखे असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “२०१९ साली भाजपाबरोबर युतीमध्ये लढलात, त्यानंतर खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. मग कट्यार कुणी काळजात घुसवली?” असा उलट सवाल म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. उद्धव ठाकरेंनी अजून स्क्रीप्टरायटर बदललेला नाही. तेच रडगाणं, तीच कथा म्हणत हा सहानभूती निर्माण करण्याच्या प्रयत्न असल्याचा आरोप म्हस्केंनी केला आहे.

धनुष्यबाणावरून वाग्बाण ! पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले? ; उद्धव ठाकरे यांचा सवाल

निवडणूक आयोगाने चार वेळा कागदपत्र दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरेंना वेळ दिला होता, मात्र त्यांनी ते दाखल केले नाहीत. शिवसेनेची ही भूमिका पूर्वनियोजित असल्याचा आरोप म्हस्के यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे भाषणात अडीच वर्ष महाराष्ट्राचं रक्त गोठवल्याबाबत काहीच बोलले नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे पक्षाची काय वाताहत झाली हे त्यांनी सांगायला पाहिजे होते” असे म्हस्के यांनी म्हटले आहे.

“काँग्रेसने नाही केलं, ते तुम्ही…”, इंदिरा गांधींचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या मुलाला कधीच नाकारलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडा हे त्यांनी ऐकलं नाही. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी तडजोड केल्यानं उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली आहे, असा हल्लाबोल म्हस्केंनी केला आहे. “बाळासाहेब आमचं दैवत आहे. त्यांचं नाव घेऊ नका हे आम्हाला कोणीही सांगू शकत नाही. बाळासाहेबांची तत्व तुम्ही विसरलात. त्यामुळे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे की नाही हे जनता सांगेन” असे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हस्के म्हणाले आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *