Headlines

Dreaming About Sex : अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंधांचं स्वप्न पडलं? काय आहेत याचे संकेत?

[ad_1]

मुंबई : अनेकदा काहीजण स्वप्नात एखादया व्यक्तीसोबत लैंगिक संबंध (Dreaming About Sex) ठेवताना पाहतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, अशा स्वप्नांचा अर्थ काय? अशी स्वप्न शक्य तितक्या लवकर विसरतो. पण, ही स्वप्नं नेमकं काय सूचित करतात? त्या स्वप्नांचा अर्थ काय?

असं म्हटलं जातं की, सेक्स म्हणजेच लैंगिक संबंधांसंदर्भात स्वप्नं ही प्रत्यक्षात कधीच सेक्सबद्दल नसतात. ही स्वप्न आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल काही तरी सांगत असतात. ते स्वप्नात येणाऱ्या लोकांबद्दल नसून ते तुमच्या आयुष्याबद्दल देखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया अशा स्वप्नांचा नेमका काय अर्थ असतो.

अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंधांचं स्वप्न

कार्ल जंगचा एक सिद्धांत आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये अॅनिमस आणि अॅनिमा असतो. अ‍ॅनिमस म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली पुरुष उर्जा तर अॅनिमा म्हणजे प्रत्येक पुरुषाकडे असलेली स्त्री उर्जा. ज्यावेळी तुम्ही कल्पना करता की, तुम्ही ज्या व्यक्तीला ओळखत नाही अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत आहात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. 

तो तुमच्यातील अ‍ॅनिमस किंवा अॅनिमा उर्जेचं एक प्रतीक आहे. समजा, तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्ही नम्र असलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना पाहिलंत. याचा अर्थ म्हणजे, तुमच्या व्यक्तिमत्त्वातील मर्दानी पैलू कमकुवत आहेत. अशावेळी तुम्हाला त्यावर काम करणं आवश्यक आहे. जर तो एक मजबूत आणि धाडसी माणूस तुम्हाला दिसत असेल तर त्याचा अर्थ तुमचं व्यक्तिमत्व स्त्री आणि पुरुष शक्तींच्या योग्य संतुलनामध्ये आहे.

लैगिंक संबंधांदरम्यान चेहरा न दिसणं 

स्वप्नात अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स करणं म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हालाच अद्याप माहित नसलेल्या एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं असे नाही. हे फक्त तुमच्या जीवनातील एक विचित्र पैलू समजून घेण्याचा प्रयत्न आहे. याचा अर्थ तुमचं जीवन आणि विचार अधिक नियंत्रित आणि दृढ होऊ शकतात, असा याचा अर्थ आहे.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *