Headlines

Online Shopping करताना ‘या’ गोष्टींची काळजी घेतली नाही तर, फसवणूक होणारच

[ad_1]

नवी दिल्ली: Online Shopping Frauds: सध्या सर्वत्र फेस्टिव्ह सिझनसोबत ऑनलाइन खरेदीचा सिझनही सुरू आहे. अनेक जण आता ऑनलाइन खरेदीलाच प्राधान्य देतात. परंतु, ज्या प्रकारे घोटाळे वाढत आहेत, त्या हिशोबाने लोक ऑनलाइन खरेदी करणे बंद तर करणार नाही असाही प्रश्न आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या घोटाळ्यामुळे अनेकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अगदी छोटीशी चूक देखील ऑनलाईन स्कॅमला कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही अशाच काही गोष्टींबद्दल माहिती देत आहोत, जे तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगदरम्यान होणाऱ्या घोटाळ्यांपासून वाचवतील. पाहा डिटेल्स.

वाचा: Jio च्या ‘या’ स्वस्त प्लानमध्ये Netflix आणि Prime Video सह २०० GB डेटा फ्री, पाहा किंमत

Online Scams कसे टाळायचे?

जर तुम्हाला एखाद्या अनोळखी वेबसाइटला भेट देत असाल ज्यावर उत्पादनावर भरघोस सूट देण्यास सांगितले जात असेल तर, त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. कारण, अनेकदा अशा वेबसाइट्स लोकांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले आहे.

ऑफरवर कधीही लगेचच विश्वास ठेवू नका:

कोणत्याही ऑफरवर कधीही लागेचच विश्वास ठेवू नका. कारण, कोणतीही कंपनी आपले नुकसान करून तुम्हाला कोणतीही ऑफर देणार नाही.

वाचा: हा Nokia फोन खरेदी केल्यावर बँक खात्यात येतील १ हजार रुपये, सोबत अतिरिक्त फायदे, पाहा डिटेल्स

सामान्यपेक्षा भिन्न पेमेंट पर्याय ऑफर करणाऱ्या वेबसाइट्सपासून सावध रहा. सोशल मीडियावर अनेक जाहिराती येतात किंवा तुम्हाला अनावधानाने मेसेज येतात, त्यांच्यापासून सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण, हे सर्व तुम्हाला फसवण्याच्या हेतूने केले जाते.

बँकिंग तपशील सेव्ह करू नका:

कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर तुमचे बँकिंग तपशील सेव्ह करू नका. हे धोकादायक ठरू शकते. तुम्ही लुकअप टूल देखील वापरू शकता. हे साधन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही ज्या साइटवरून खरेदी करत आहात ती आधीच स्कॅम डोमेन म्हणून ओळखली गेली आहे की नाही. याबद्दल हे टूल माहिती देते.

वाचा: फेस्टिव्ह सिझनमध्ये असे मिळवा Confirm Train Ticket, प्रोसेस सोपी , पाहा टिप्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *