Headlines

Diwali 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी ‘हे’ करा आणि ‘हे’ करु नका!

[ad_1]

Diwali 2022 Vaastu Tips: दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी…दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. टीव्हीवर अनेक वर्षांपासून प्रसिद्ध जाहीरात उठा उठा दिवाळी आली…घरात सुर ऐकायला मिळतं आहे. गृहिणीची साफसफाई आणि फराळाची लगबग सुरु आहे. घरातील इतर मंडळी कंदील, लाईटिंगचं सामान गोळा करत आहेत. तर लहान मुलांमध्ये यावेळी कुठले फटाके फोडणार यावर चर्चा रंगली आहे. दिवाळी हा आनंदा, प्रकाशाचा सण…घरातील नकारात्मक अंधकार कायमचा दूर व्हावं म्हणून आपण आपलं घर प्रकाशमय करतो. 

दिवाळी साजरा करण्याचा ट्रेंड (Trend) बदला

गावाखेड्यात आजही पारंपरिक पद्धतीने दिवाळी आजही साजरा करण्यात येते. पण मोठ्या शहरामध्ये नोकरीच्या धावपळीत दिवाळी साजरी करण्याचे ट्रेंड बदला आहे. कॉपोर्रेट कंपन्या आणि हायफाय सोसायटीमध्ये लक्ष्मीपूजन 2022 (Lakshmi Pujan 2022) म्हणजे दिवाळीच्या दिवशी मद्यपान केलं जातं. याशिवाय अशा अनेक गोष्टी दिवाळीच्या दिवशी केल्या जाता ज्या ज्योतिषशास्त्र आणि वास्तूशास्त्रानुसार करणे अशुभ मानले जातात. तर लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळीच्या दिवशी काय करावे आणि काय करु नये, याबद्दल सांगणार आहोत. (Diwali 2022 and Lakshmi Puja 2022 Vaastu Tips nmp )

लक्ष्मीपूजन 2022 दिवशी या गोष्टी करा (Lakshmi Pujan 2022 day)

1- दिवाळीमध्ये लक्ष्मी आणि गणपतीची स्थापना करू पूजा करा

2- गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या हाताला नेहमी लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करा. 

3- घराच्या अंगणात आणि पूजाच्या ठिकाणी शुभ चिन्हाची रांगोळी काढा. रांगोळी काढण्यासाठी तुम्ही गेरू किंवा तांदुळाच्या पीठाचा वापर करा. 

4- या दिवशी विषम संख्येत पणत्या लावाव्या जसं 11, 21, 51 किंवा 101 अशी संख्या शुभ मानली जातं. 

5- पूजेच्या वेळी दोन मोठे दिवे किंवा निरांजन लावावी. एक तूपाचं आणि एक तेलाचं. 

6- पूजेच्या वेळी ‘ॐ श्रीं हृीं श्रीं महालक्ष्म्यै नम:’ मंत्राचं सतत उच्चारण करावं. 

7- महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी पिवळ्या कवड्या ठेवाव्या. यामुळे घरात कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता जाणवणार नाही. 

8- लक्ष्मी मातेला बेलपत्र किंवा कमळाचं फूल आणि गणपतीला दूर्वा जरूर वाहाव्यात. 

9- लक्ष्मीपूजन करताना हळकुंड ठेवावं. जे नंतर तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. 

10- दिपावली पूजेनंतर संपूर्ण घरात शंखनाद किंवा घंटी वाजवा. असं केल्याने घरातील नकारात्मक उर्जेचा नाश होतो.

लक्ष्मीपूजन 2022 दिवशी या गोष्टी टाळा 

1- शास्त्रांनुसार जे लोकं दिवाळीच्या शुभ दिवशी मद्यपान करतात ते सदैव दरिद्री राहतात. त्यांच्या घरात नेहमी दारिद्रय वास करतं. त्यामुळे दिवाळीमध्ये मद्यपान करणं टाळा. 

2 – घरातील झाडू कोणाच्याही दृष्टीस पडेल असा ठेवू नका. लपवून ठेवा. 

3 – तसंच दिवाळीत काढण्यात येणाऱ्या रांगोळीत काळा आणि करड्या रंगाचा वापर करू नये. 

4- घरामध्ये कोणतीही तुटलेली किंवा टाकाऊ वस्तू ठेवू नये. 

5- दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. पण लक्षात ठेवा की, या वस्तूमध्ये कोणतीही चामड्याची वस्तू नसावी. यामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती असते. 

6- दिवाळीची पूजा करताना काळे कपडे घालणं टाळावं. वास्तुनुसार, कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना काळे कपडे घालू नये. असं केल्याने देवी लक्ष्मी रूसते. 

7- या दिवशी कोणाशीही वादविवाद करू नये. यामुळे घरातील वातावरण बिघडतं आणि घरात आनंद येण्याऐवजी संकट येण्याची भीती निर्माण होते. त्यामुळे या काळात मन शांत ठेवावं आणि आनंद वाटावा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *