बार्शी/प्रतिनिधी – लायन्स क्लब बार्शी च्या वतीने रविवारी रामकृष्ण हॉटेल येथे शिक्षकरत्न पुरस्कार , लायन्स इंजिनियर पुरस्कार , लायन्स फार्मासिस्ट पुरस्काराचे प्रदान करण्यात आले. तसेच या वेळेस रिझन चेअरमन यांच्या अधिकृत भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब चे अध्यक्ष ॲड. विकास जाधव होते. प्रमुख उपस्थिती मध्ये झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी , सचिव संतोष जोशी , खजिनदार अल्ताफ शेख हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात लायन्स शिक्षकरत्न पुरस्कार प्रफुल्ल भास्कर गाढवे , रामचंद्र हरिदास इकारे , प्रशांत काशिनाथ कोल्हे , नागनाथ एकनाथ जाधव , प्रतापसिंह नाशिकराव मोहिते , वैजनाथ दिगंबर मोरे, प्रणिता हेमंत जोशी , लायन्स इंजिनियर पुरस्कार गिरीश प्रभाकर देशपांडे , शकील अहमद शेख , लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार ओंकार प्रभुलिंग शहाणे , सुनील जयंतीलाल ललवाणी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
लायन्स क्लब बार्शी हा क्लब सामाजिक कामाला अग्रेसर आहे. सध्या माणसे माणसाची सेवा करताना विचार करतात. परंतु ॲड. विकास जाधव व क्लब चे संचालक मंडळ हे सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. असे प्रतिपादन लायन्स क्लबचे रिझल्ट चेअरमन आझम शेख यांनी केले.
यावेळी बापूसाहेब कदम ,अक्षय बंडेवार, प्रशांत पंडित, गिरीश शेटे ,महेंद्र कथले ,संदीप नागणे ,ओंकार शहाणे, सुभाष भोसले ,बालकिसन जाजू, राहूल साखरे, अरुण येळे, लायन्स क्लब बार्शी चेतना चे पदाधिकारी ईश्र्वरी जोशी गायत्री बंडेवार जयश्री कदम यांच्या सह प्रमुख पदाधिकारी सभासद उपस्थित होते