Headlines

“दिनेश कार्तिकसाठी संघात जागा नाही”; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे धक्कादायक विधान

[ad_1]

Dinesh Kartik : गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) दमदार खेळी करत आहेत. आयपीएलमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडू (RCB) खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने फिनिशरची भूमिका निभावली होती. प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी टाकलेली जबाबदारी दिनेश कार्तिकने पार पाडली होती. त्यानंतर भारतीय संघाकडूनही खेळताना कार्तिकने उत्तर फिनिशरची भूमिका निभावली. मात्र आता भारताच्या माजी खेळाडूने दिनेश कार्तिकबाबत मोठं विधान केलं आहे.

आशिया कपसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघात विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल (KL Rahul) यांनी पुनरागमन केलं आहे. तसेच दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर भारताचे माजी खेळाडू अजय जडेजा (Ajay Jadeja) यांनी दिनेश कार्तिकबाबत मोठं विधान केलं आहे. कार्तिकसाठी भारतीय संघात जागा नसल्याचे अजय जडेजा यांनी म्हटले आहे.

 अजय जडेजा यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यापूर्वी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन मोठ्या स्पर्धेसाठी कशी असावी हे सांगितले आहे. जडेजा यांनी आपल्या संघासाठी चार गोलंदाजांची निवड केली आहे, ज्यामध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज आहे. त्याचवेळी त्याने दिनेश कार्तिकबद्दल म्हटले आहे की, त्याने माझ्यासोबत बसून कॉमेंट्री करावी.

फॅनकोडवर जडेजा म्हणाले की, “मी शमीचा संघात समावेश केला आहे. मी आधी गोलंदाजांची निवड करतो. त्यामुळे शमी नक्कीच आहे. बुमराह, अर्शदीप आणि चहल हे चौघे नक्कीच आहेत. फलंदाजीत माझ्यासाठी चार निश्चित आहेत – ऋषभ पंत , हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुडा. या गोलंदाजांकडे मधल्या षटकात आणि डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची ताकद आहे. फलंदाज कुठेही फलंदाजी करू शकतात.”

“आता जर तुम्हाला मी ऐकल्याप्रमाणे खेळायचे असेल, तर तुम्हाला वेगळी निवड करावी लागेल. जर विराट कोहली आणि रोहित शर्मा आले तर तुम्हाला दिनेश कार्तिकची गरज आहे. पण जर दोघांपैकी तुमच्या संघात कोणीही नाही तर दिनेश कार्तिकचे इथे काही काम नाही. मी दिनेश कार्तिकला संघात ठेवणार नाही, असे अजय जडेजा यांनी म्हटले आहे.

“मी कार्तिकला तिथे ठेवणार नाही, तो माझ्या बाजूची जागा घेऊ शकतो. तो एक चांगला समालोचक आहे पण मी त्याची संघात निवड करणार नाही. आता निर्णय तुमचा आहे, असेही जडेजा यांनी म्हटले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *