Headlines

धोनीने तब्बल 2 वर्षानंतर Instagram ला शेअर केला व्हिडीओ, काही मिनिटातच करोडो Views

[ad_1]

Dhoni Drives Tractor in Farm: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) तब्बल दोन वर्षांनी Instagram वर पुनरागमन केलं आहे. धोनीने Instagram वर एक व्हिडीओ शेअर केला असून काही तासातच या व्हिडीओला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओत धोनी रांचीमधील (Ranchi) आपल्या फार्महाऊसमधील (Farmhouse) शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. धोनीची पोस्ट पाहून त्याचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते धोनी Instagram वर पुन्हा कधी सक्रीय होणार याची वाट पाहत होते. 

धोनीने पोस्ट शेअर करताना लिहिलं आहे की “काहीतरी नवी न शिकणं चांगला अनुभव होता. पण काम संपवण्यासाठी फार वेळ लागला”. 

व्हिडीओमध्ये धोनी शेतात ट्रॅक्टर (Dhoni Drives Tractor) चालवत आपण नवीन गोष्ट शिकल्याचं चाहत्यांना दाखवत आहे. काही वेळाने त्याच्या शेजारी ट्रॅक्टरमध्ये एक व्यक्ती बसल्याचं दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी धोनी काम संपवत असल्याचं दिसतं. 

धोनीने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहते तुटून पडले आहेत. व्हिडीओला काही तासातच 1 कोटी व्ह्यू मिळाले होते. धोनीच्या या पोस्टवर चेन्नई सुपरकिंग्जनेही कमेंट केली असून धोनी फार दिवसांनी Instagram ला परतला असल्याचं सांगितलं आहे.  

“इतक्या दिवसांनी धोनीला इन्स्टाग्रामवर पाहून आनंद झाला,” असं एका युजरने म्हटलं आहे. दरम्यान एका युजरने “धोनीला अखेर 2 वर्षांनी इन्स्टाग्रामचा पासवर्ड सापडला, Love You माही भाई” असं मजेशीरपणे म्हटलं आहे. 

दोन वर्षांपूर्वी केली होती अखेरची पोस्ट 

धोनी दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामला शेवटची पोस्ट केली होती. 8 जानेवारी 2021 ला केलेल्या या पोस्टमध्ये धोनी आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी तोडत असल्याचं दिसत होतं. यानंतर त्याने ती खाल्लीही होती. धोनीने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं होतं की, “जर मी असाच फिरत राहिलो तर शेतात एकही स्ट्रॉबेरी शिल्लक राहणार नाही”.

महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आपल्या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत धोनीने अनेक रेकॉर्ड केली. टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला होता. निवृत्तीनंतर धोनी आपल्या कुटुंबासह वेळ घालवत आहे. दरम्यान धोनीने अद्याप आयपीएलमधून निवृत्ती घेतलेली नाही. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *