Headlines

Dhoni: पंतच्या इन्स्टा लाईव्हवर फक्त 2 सेकंदासाठी आला आणि ट्रेंडवर नंबर 1 बनला

[ad_1]

मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंह धोनीचा सोशल मीडियावर कायमच बोलबाला आहे. त्याची फॅन फॉलोईंग बाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तो जिथे ही जातो त्याला पाहून लोकं त्याच्या मागे गर्दी करतात. धोनी फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. (Dhoni ln insta live with rishabh pant))

सध्या त्याचा एक छोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालं असं की, ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर लाइव्ह केले, ज्यामध्ये एमएस धोनी फक्त दोन किंवा तीन सेकंदांसाठी दिसला. पण यानंतर ट्विटर, इंस्टाग्रामवर एमएस धोनीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे, बुधवारी टीम इंडियाला मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना खेळायचा आहे आणि त्यानंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका आहे. पण त्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काही सेकंदासाठी दिसला. अवघ्या दोन सेकंदांसाठी एमएस धोनी इंस्टाग्राम लाइव्हमध्ये आला.

टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने मंगळवारी इंस्टाग्राम लाइव्ह केले. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्यासह आणखी काही खेळाडू आले. ऋषभ पंतनेही अनेक चाहत्यांना त्याच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह जोडले. बराच वेळ चाललेल्या या लाईव्हमध्ये खेळाडूंनी गप्पा मारल्या आणि मजेदार संभाषण केले.

जेव्हा ऋषभ पंतने इंस्टाग्राम लाइव्हवर साक्षी धोनीला अॅड केले, तेव्हा साक्षीने सर्वांना नमस्कार केला, त्यानंतर लगेचच एमएस धोनीही दिसला आणि सर्वांना हॅलो म्हणू लागला. यादरम्यान ऋषभ पंतनेही नमस्कार केला आणि सांगितले की, भावाला थोडा वेळ लाईव्ह ठेव. यामध्ये एमएस धोनी हसत हसत फोन हिसकावून थेट लाईव्ह थांबवतो.

एमएस धोनीचा हा दोन-तीन सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर पसरला. एमएस धोनी ट्विटरवर नंबर-1 ट्रेंड बनला आहे. चाहत्यांनी त्याच्याबद्दल अप्रतिम प्रतिक्रिया दिल्या आणि मीम्सही बनवले.

चाहत्यांनी लिहिले की, क्रिकेटमधून निवृत्तीच्या इतक्या वर्षानंतरही एमएस धोनी चाहत्यांचा लाडका आहे. आणि अशा प्रकारे, जेव्हा तो काही क्षणांसाठी एका व्हिडिओमध्ये दिसला, तेव्हा तो अशा प्रकारे टॉप ट्रेंड बनला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *