Headlines

devendra fadnavis wife amruta fadnavis on uddhav thackeray over election commission freezes arrow and symbol shivsena ssa 97

[ad_1]

गेली ५ दशकं मराठी आणि हिंदुत्वावर हुंकार काढणारी शिवसेना गेली तीन महिन्यांच्या कालावधीपासून संकटांचा सामना करत आहे. शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता पक्षावरच दावा करण्यात आला आहे. हा सर्व वाद आता निवडणूक आयोगाच्या समोर सुरु आहे. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ आणि पक्षाच नाव गोठवलं आहे.

‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांना चिन्ह गोठवण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचं सांगत त्यांच्यावर टीका केली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

हेही वाचा – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा? नाना पटोले यांनी थेट सांगितले; म्हणाले “आमचा हात…”

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का कोणता आहे. पहिला ‘धनुष्यबाण’ चिन्ह गेल्याने, ४० आमदार आणि १२ खासदारांनी साथ सोडली, भाजपाशी असलेले संबंध तुटणे आणि अखेरचा हिंदुत्ववादी पक्षाची प्रतिमा पुसणे, असे प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारले आहे. त्यांच्या ट्विटला आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळतं पहावे लागणार आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांनी यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्ला केला आहे. तेव्हा त्यांना शिवसेनेकडूनही उत्तर देण्यात आलं. मात्र, आता अमृता फडणवीस यांच्या ट्विटने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *