Headlines

दिल्लीला पाठवलेल्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नाव असल्याची चर्चा, भाजपा आमदार श्वेता महाले म्हणाल्या… | BJP MLA Shweta Mahale on Shinde Fadnavis cabinet expansion pbs 91

[ad_1]

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याची सूत्रे हाती घेतली. येत्या काही दिवसात मंत्रीमंडळ विस्तार देखील होणार आहे. त्यासाठी संभाव्य मंत्र्याची यादी दिल्ली दरबारी पाठवण्यात आल्याची आणि त्या संभाव्य यादीमध्ये चिखली मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे नाव असल्याची चर्चा आहे. त्याबाबत श्वेता महाले यांनाी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

श्वेता महाले म्हणाल्या, “मी पक्षाकडून कधीही मंत्री किंवा इतर पदाची अपेक्षा केलेली नाही, त्या यादीबाबत मला कुठलीच माहिती नाही. मी पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली कुठलीही जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे. तसेच पदासाठी किंवा कुठल्या अपेक्षेसाठी मी राजकारणात आलेली नाही.”

द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आपले पारंपरिक नृत्य सादर करत शहरातून रॅली काढली होती. या रॅलीत शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. त्यादरम्यान श्वेता महाले माध्यमांशी बोलत होत्या.

बुलडाणा जिल्ह्यातून आगामी मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपदाच्या स्पर्धेत तीन पंचवार्षिक आमदार असलेले शिवसेनेचे संजय रायमुलकर आणि फडणवीसांच्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले डॉ. संजय कुटे आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी निश्चित समजली जात होती. मात्र, आता महिला उमेदवाराचा विचार पुढे आल्याने श्वेता महालेंची चर्चा आहे. महाले मराठवाडा, विदर्भातून एकमेव महिला आमदार आहेत. त्या भाजपा पक्षश्रेष्ठींच्या निकटवर्ती मानल्या जातात. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्यात लाल दिवा कुणाला मिळतो आणि जिल्ह्यात किती मंत्रीपदं मिळतील याकडे बुलडाणा जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *