Headlines

दिवाळीनंतर ग्रहणाची सावली! जाणून घ्या या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल…

[ad_1]

Chandra Grahana 2022: चंद्रग्रहण ही एक अद्भूत खगोलीय स्थिती आहे. चंद्रग्रहणाबद्दल अनेक तर्क-वितर्क केले जातात. यावर्षीच शेवटचं चंद्रग्रहण पाहता येणार आहे. यावर्षीच्या चंद्रग्रहणाची वेळ आणि स्थिती जाणून घेऊया खालील माहितीतून. हे चंद्रग्रहण या वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. (last lunar eclipse of this year in november after diwali)

ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणाबाबत हिंदू धर्मात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. शास्त्रानुसार ही एक अशुभ घटना मानली जाते आणि या काळात कोणत्याही प्रकारची पूजा आणि शुभ कार्य करण्यास मनाई आहे. या वर्षी एकूण 4 ग्रहण आहेत. त्यातली दोन ग्रहण यावर्षी होऊन गेली आहेत. 

सूर्यग्रहणानंतर 15 दिवसांनी चंद्रग्रहण होते. अशावेळी दिवाळीला सूर्यग्रहण असून दिवाळीच्या ठीक 15 दिवसांनी देव दीपावलीला चंद्रग्रहण होणार आहे. यावेळी दिवाळी 25 ऑक्टोबर रोजी येत आहे आणि याच्या 15 दिवसांनी देव दीपावलीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे. यावेळी देव दीपावली 8 नोव्हेंबर रोजी येत आहे. परंतु चंद्रग्रहणाच्या सुतकापूर्वीच देव दीपावली साजरी केली जाईल, त्यामुळे जाणकारांच्या मते एकदाच देव दिवाळी ग्रहणाच्या आधी 7 नोव्हेंबरला एक दिवस साजरी केली जाईल.

2022 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्याची वेळ 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.32 ते 7.27 पर्यंत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भारतासह दक्षिण/पूर्व युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंद महासागरात पाहता येईल.

चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. अशा स्थितीत सुतक लागण्यापूर्वीच देव दीपावली साजरी होईल.

ग्रहणाशी संबंधित खास गोष्टी – 

  • शास्त्रज्ञांच्या मते, चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच क्रमाने असतात, त्यामुळे चंद्रग्रहण होते.
  • ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहण काळात अनेक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • ग्रहणानंतर हिंदू धर्मात दान आणि स्नानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
  • ग्रहणाचा सुतक काळ अशुभ असतो असे म्हणतात. यामध्ये कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करू नये. सुतक काळ ग्रहण संपेपर्यंत असतो.
  • गरोदर स्त्रिया विशेषतः चंद्रग्रहणाच्या काळात स्वतःची काळजी घेतात. या काळात भगवंताचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा आणि कोणतेही काम करू नका.
  • सुतक लावल्यानंतर पूजा करण्यास मनाई आहे.
  • या काळात प्रवास करणे आणि झोपणे देखील निषिद्ध आहे.
  • ग्रहण काळात कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नका.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 taas त्याची पुष्टी करत नाही.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *