Headlines

‘दयावान’ फेम अभिनेते Mangal Dhillon यांचे निधन, कॅन्सरनं घेतला जीव

[ad_1]

Mangal Dhillon Death : लोकप्रिय अभिनेते आणि लेखक मंगल ढिल्लोन यांचे निधन झाले आहे. पंजाबच्या लुधियाना येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगल ढिल्लोन यांचं निधन कर्करोगामुळे झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंगल ढिल्लोन हे आजारी होते. तर तर महिन्याभरापासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांच्या तब्येतीत काही फरक पडला नाही आणि आज 11 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

मंगल ढिल्लोन यांचा 18 जून रोजी वाढदिवस होता. पण त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली नाही. असं म्हटलं जातं की मंगल ढिल्लोन यांच्यावर लुधियानाच्या रुग्णालयात गेल्या एक महिन्यापासून कॅन्सरवर उपचार सुरु होते. अभिनेते यशपाल शर्मा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना मंगल यांच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला. यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तर मंगल ढिल्लोन यांचा जन्म हा पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील वांजर जटाना गावात झाला होता. तिथल्याच सरकारी शाळेतील चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते उत्तर प्रदेशला आले. येथे त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत पुढचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पंजाबला परतले. 

मंगल ढिल्लोन यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मंगल ढिल्लोन यांनी पेंटर रितू ढिल्लोन यांच्यासोबत 1994 साली सप्तपदी घेतल्या. रितू या मंगल यांच्या प्रोडक्शनच्या कामात मदत करायच्या मंगल ढिल्लोन फक्त एक अभिनेता नाही तर दिग्दर्शक आणि प्रोड्युसर देखील होते. त्यांनी एमडी एंड कंपनीच्या नावानं एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले होते. त्या बॅनरच्या अंतर्गत ते अनेक पंजाबी चित्रपटांची निर्मिती करत होते. 

हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्री Rubina Dilaik च्या गाडीला अपघात, पती अभिनवनं कारचा फोटो शेअर करत, म्हणाला…

मंगल ढिल्लोन यांनी पंजाबी नाटकातून अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मंगल ढिल्लोन फक्त बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर नाही तर पंजाबी चित्रपटांमध्ये देखील लोकप्रिय होते. त्यांनी पंजाबी चित्रपटांमध्ये काम करत त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांनी रेखा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘खून भरी मांग’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात मंगल यांनी वकिलाची भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी अनेक आणखी लोकप्रिय भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटांमध्ये ‘दयावान’, ‘जख्मी औरत’, ‘प्यार का देवता’, ‘विश्वात्मा’, ‘दलाल’, ‘बुनियाद’, ‘जुनुन’, ‘खून भरी मांग’ या सारख्या चित्रपट आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *