Headlines

दिवसभर अॅसिडीटी, सोलवटलेले पाय आणि… ; एका Cannes साठी अभिनेत्रीच्या जीवाचा आटापिटा

[ad_1]

मुंबई : कान्सच्या रेड कार्पेटवर जायचं म्हटलं की अभिनेत्री म्हणा किंवा कोणही इतर व्यक्ती म्हणा. अफलातून लूकमध्येच रेड कार्पेटवर एंट्री मारायची, असाच प्रत्येकाचा अट्टहास असतो. पण, कधीकधी सुंदर दिसण्याच्या नादात सेलिब्रिटी मंडळींना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, की त्यांना चांगलाच धडा मिळतो. (actress Helly Shah Cannes shocking revelations )

असंच काहीसं घडलं, अभिनेत्री हेली शाह हिच्यासोबत. हेलीनं नुकतीच कान्सच्या रेड कार्पेटवर एंट्री मारली. तिथं जाण्याची ही तिची पहिलीच वेळ. मिंट ग्रीन रंगाच्या एका गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर आली आणि तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. 

हेलीचा तिथला प्रवास हेवा वाटण्याजोगा असला तरीही तो तितकासा सोपा नव्हता. कान्समध्ये जाण्याचा तो दिवस बराच आव्हानात्मक होता असं खुद्द हेली सांगते. कारण, त्या दिवशी तिच्यासोबत सर्व चुकीच्याच गोष्टी घडत होत्या. 

याची सुरुवात झाली होती, तिचा ड्रेस उशिरानं पोहोचण्यापासून. ड्रेसच वेळेत न आल्यामुळे हेली प्रचंड हैराण होती. ड्रेस येताच ती ताबडतोब ट्रायलसाठी गेली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण दिवसभरात काहीही खाल्लेलं नाही. 

रिकाम्या पोटी असल्यामुळं तिला अॅसिडिटीचा त्रास झाला आणि यामुळं संपूर्ण कार्यक्रमात तिला त्रास जाणवत राहिला. उरलेली त्रासाची कमतरता तिच्या हिल्सनं भरून काढली. 

हाय हिल्स फुटवेअर घातल्यामुळे हेलीचे पाय सोलवटून निघासे होते. हिल्स वापरणं कधीच सोपं नसतं, असंच तिचं म्हणणं. इतका त्रास आणि जीवाचा आटापिटा करुनही हेली जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा मात्र तिच्या सौंदर्यानं सर्वजण घायाळ झाले. थोडक्यात काय… शेवट गोड तर, सर्व गोड. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *