Headlines

Dasara Melava 2022: ‘कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच…’, ‘माझी इच्छा…’; नाराजीबद्दल पंकजा मुंडे दसरा मेळ्यात स्पष्टच बोलल्या | Dasara Melava Pankaja Munde clarifies about unhappy with bjp scsg 91

[ad_1]

भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यामध्ये अनेक विषयांवर सूचक विधानं केली. मात्र पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य करताना एक इच्छा व्यक्त केली आहे. दुपारी दीड वाजता पंकजा खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसोबत कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अगदी २०२४ च्या निवडणुकीपासून ते नाराजीबद्दल अनेक विषयांवर भाष्य केलं.

नक्की वाचा >> Dasara Melava: शिंदे गट आणि ठाकरे गट समर्थक मुंबईत आमने-सामने आल्यास…; विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “एकमेकांच्या समोर…”

गडावर दाखल झाल्यानंतर पंकजा आणि प्रतीम मुंडे यांनी आरती केली. यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या. जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना हा मेळावा संघर्ष करणाऱ्यांचा असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. “हा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे. जे गोपीनाथ मुंडे यांचे विरोधक होते तसेच ज्यांनी मला विरोध केला त्यांच्यापबद तो विरोध करताना पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी कधीही बोलले नाही. कधीही कुणावर वैयक्तिक आरोप केले नाही, खालच्या पातळीवर जाऊन मी कधीही टीका केलेली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीबद्दल बोलून आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही,” असं म्हणत पंकजा यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांना सूचक इशारा दिला.

नक्की वाचा >> Dasara Melava: “‘समृद्धी महामार्गा’वर सामान्यांना बंदी मग शिंदे समर्थकांना तो वापरण्याची परवानगी कोणी दिली? गुन्हे दाखल करा”

मुंबईमधील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यांची तयारी आणि चर्चा असतानाच पंकजा यांनी मात्र आपल्याकडे समर्थकांना बसायला खुर्चा देण्याचीही ऐपत नसल्याचं म्हटलं. “हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं,” अशी शेरोशायरी करत पंकजा यांनी, “इथं जमलेले लोक ही ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नाहीत. तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं यासाठी मी तुमचे आभार मानते,” असं म्हणत समर्थकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘उद्धव यांचं आमंत्रण आल्यास मेळाव्याला जाणार’ म्हणणाऱ्या राणेंना सेनेचं उत्तर; म्हणाले, “संध्याकाळपर्यंत…”

आपण कोणासमोरही झुकणार नाही असं पंकजा यांनी आपल्या भाषणात म्हटलं. “कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालेलं नाही. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही,” असा शब्द पंकजा यांनी समर्थकांना दिला.

नक्की वाचा >> ‘‘खोके’वाल्यांचा अधर्म…’, ‘पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजपा…’; दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंकडून हल्लाबोल

भाषणाच्या शेवटाकडे पंकजा यांनी त्यांच्या नाराजीबद्दल सुरु असणाऱ्या चर्चेवर भाष्य केलं. “माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. माझी इच्छा आहे की, तुम्ही कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका.” असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. “इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मी मंत्री असताना मोनिका राजळे आणि इतरांना हाताने वाढून जेवू घालत होते. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे,” असं पंकजा म्हणाल्या.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *