Headlines

‘फक्त सेक्सद्वारेच इंडस्ट्रीत काम मिळू शकते’, ‘दंगल गर्ल’ फातिमाने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव

[ad_1]

Fatima Sana Shaikh Birthday Special: अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांच्या करिअरमध्ये कधीनाकधी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. अनेकींनी आपले थरारत अनुभन सर्वांसमोर आणले आहेत. ‘दंगल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली फातिमा सना शेखने पदार्पणातच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. तिने आपली स्वत:ची ओळख बनवली आहे. तिचे सौंदर्य आणि अभिनयाचे चाहते संपूर्ण देशात आहेत. फातिमाने सांगितलेला कास्टिंग काऊचचा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. याबद्दल जाणून घेऊया. 

फातिमाचा जन्म 11 जानेवारी 1992 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे वडील विपिन शर्मा जम्मूतील एका हिंदू परिवारातील आहेत. तर तिची आई राज तबस्सुम श्रीनगरच्या एका मुस्लिम परिवारातून आहे. फातिमा आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. फातिमाच्या जन्मदिनी तिच्या आयुष्यातील खास गोष्टी जाणून घेऊ. 

3 वर्षांची असताना लैंगिक शोषण 

फातिमाने तिला बालपणी आलेला एका वाईट अनुभव सांगितला. लहान वयातच फातिमाला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता, असा धक्कादायक खुलासा तिने केला.’मी 5 वर्षांची असताना माझा विनयभंग झाला.! नाही. मी 3 वर्षांची होते. त्यामुळे लैंगिकता किती खोलवर रुजली आहे तुम्ही समजू शकता, असे तिने मुलाखतीदरम्यान सांगितले. ही एक लढाई आहे जी आपण दररोज लढतो. असे असले तरी आपले भविष्य चांगले असेल अशी आशा तिने व्यक्त केली.

‘कास्टिंग काऊच’चा सामना 

फिल्मी दुनियेत अनेक अभिनेत्रींच्या वाट्याला जे दु:ख येतं त्यातून फातिमालाही जावे लागले. पण फार कमी अभिनेत्री याबद्दल खुलेपणाने मोकळ्या होतात. फातिमाने फिल्मी दुनियेतील काळे सत्य उघडपणे उघड केले होते. मला करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउचचाही सामना करावा लागला होता. सुरुवातीलाच मला असे लोक भेटले आहेत ज्यांनी मला सांगितले की, तुला फक्त सेक्सद्वारेच इंडस्ट्रीत काम मिळू शकते. हे ऐकून फातिमाला जोरदार धक्का बसला. 

कास्टिंग काऊचला विरोध केल्याने अनेकदा मला माझे काम सोडावे लागले. माझ्या जागी इतर कोणाला तरी चित्रपटात कास्ट केले गेल्याचे वास्तव तिने सांगितले. पण मला वाटते की या इंडस्ट्रीबाहेरही अनेक लोक आहेत ज्यांना अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सेक्सज्म प्रत्येक इंडस्ट्रीत आहे, असेही तिने मुलाखतीदरम्यान सांगितले. 

मला अनेक वेळा चित्रपटांमधून रिप्लेस करण्यात आल्याचे फातिमाने मुलाखतीदरम्यान सांगितले. कित्येकदा तर मी अर्ध्या चित्रपटाचे शूटींग केले आणि सिनेमा शेवटाकडे आला असताना मला बाहेर काढण्यात आले, असा वाईट अनुभवही तिने शेअर केला. 

लूकमुळे टोमणे 

जेव्हा मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या लूकमुळे मला लोकांनी टोमणे मारायला सुरुवात केली. तू दीपिका पदुकोण किंवा ऐश्वर्या रायसारखी दिसत नाहीस. तू कधीच नायिका होऊ शकत नाहीस असे सांगून मला चित्रपटांमधून नाकारण्यात आल्याचे वास्तव फातिमाने सांगितले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *