Headlines

‘पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट…’; राखी सावंत संतापली

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. शुक्रवारी 2 फेब्रुवारी रोजी पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पूनम पांडेने स्वत: एक व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याची माहिती दिली आहे. पूनमने सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हा स्टंट केल्याचे म्हटलं आहे. त्यावर आता अभिनेत्री राखी सावंतने तिला झापलं आहे. 

राखी सावंतचा संताप

राखी सावंतचा एक व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजने शेअर केला आहे. यात राखी पूनम पांडेच्या या स्टंटवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी राखी म्हणाली, “अरे पूनम तू वेडी आहेस का? तू तर आमचा जीवच घेतला होतास. तू पागल आहेस का? पूनम पांडे तू पागल आहेस का? असा मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं? तू मीडियाचा विश्वासघात केलास, तुझ्या चाहत्यांचा विश्वास तोडलास. तू माझाही विश्वासघात केलास.”

“तुझं नक्की काय चाललं आहे? यानंतर आता तू व्हिडीओ बनवून टाकलास आणि सांगतेस की मी जिवंत आहे. अशा घाणरेडा प्रँक कोणी कधी करतं का? कोण अशा प्रँक करतं? वेडी कुठली? तुला माहितीये मी कालपासून दु:खी होती. माझ्या गाण्याचा व्हिडीओ प्रसिद्ध होणार होता, पण मी तो केला नाही. माझ्या मैत्रिणीचे निधन झालंय, मी आज कोणतंही चांगलं काम करणार नाही, असं ठरवलं आणि तो व्हिडीओ टाकला नाही.” 

“मी तुझ्यासाठी रडत होते. असं कोण करतं? तू वेडी आहेस का? आम्ही खूप दु:खी झालोय. मीडियाचे प्रतिनिधी, तुझे चाहते किती दु:खी झालेत, याचा तू विचार केलास का? अशी घाणरेडी चेष्टा कोण करतं. पागल पूनम पांडे. यामुळे मला किती त्रास झाला.  मी तुला किती फोन केले, मेसेज केले, वॉईस मेसेज पाठवले. पण तू जिवंत आहेस हे ऐकून आनंद झाला. अशीच आनंदी राहा आणि यापुढे कधीही अशी घाणेरडी चेष्टा करु नको. मीडियाचा विश्वासघात करु नकोस. देशाच्या जनतेचा विश्वास तोडू नकोस. 32 वर्षात तुझं निधन झालं  हे ऐकून सर्वजण किती दु:खी होते”, असा संताप राखी सावंतने व्यक्त केला आहे.  राखी सावंतप्रमाणे अनेक कलाकारही पूनम पांडेला खडे बोल सुनावताना दिसत आहेत. तसेच अनेक चाहतेही पूनम पांडेच्या व्हिडीओवर चांगलेच संतापल्याचे दिसत आहेत. 

पूनम पांडे काय म्हणाली?

दरम्यान पूनम पांडेने तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती पूर्णपणे व्यवस्थित बसलेली दिसत आहे. “मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरण पावले नाही. दुर्दैवाने, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढताना ज्या हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू शकत नाही. त्यांना काहीच कळत नसल्याने त्या काही करू शकत नव्हत्या. मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की इतर कोणत्याही कर्करोगाच्या विपरीत, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करणे शक्य आहे. तुम्हाला फक्त तुमच्या चाचण्या कराव्या लागतील आणि HPV लस घ्यावी लागेल,” असे पूनम पांडेने म्हटलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *