Headlines

कोवीडमुळे निराधार झालेल्या कुंटूबाच्या मदतीसाठी राज्यातील सामाजिक संस्थाचा पुढाकार

कदाचित हे काम फार पुढे जाईल किंवा जाणार नाही.परंतु किमान माणुसकीची भावना असणा-या अनेक ठिकाणच्या संस्था या निमित्ताने एकत्र आल्या व कामाला सुरूवात झाली हि समाधानाची बाब आहे.महाराष्ट्रातील 20 हजार कुंटूबाला आधार देण्यासाठी काही कार्य करता आले तर आमच्या सर्व संस्थासाठी मोठी उपलब्धता असेल.- हेरंब कुलकर्णी

जालना : सोशल मीडियामुळे कोरोना महामारीत विधवा झालेल्या महिलांसाठीचे नेटवर्क तयार झाले असून निराधार झालेल्या कुटुंबांच्या मदतीसाठी २५ जिल्ह्यांतील १ ९ ० सेवाभावी संस्था एकत्र येऊन नियोजन करीत आहेत . सोशल मीडियावर सामाजिक कार्यकर्ते शिक्षक हेरंब कुलकर्णी यांनी कोरोनाने ज्या कुटुंबात मृत्यू झाले त्या निराधार कुटुंबांसाठी सरकारने काहीतरी करायला हवे , यासंदर्भात पोस्ट लिहिल्या . त्यावर लेख लिहून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले . त्यानंतर या विषयावर महाराष्ट्रातील ज्या संस्थांना व कार्यकर्त्यांना काम करावेसे वाटते त्यांनी संपर्क करावा अशी पोस्ट टाकली या पोस्टमुळे अवघ्या चार दिवसात १ ९ ० संस्था व व्यक्तींनी कुलकर्णी यांना संपर्क केला . आम्हाला या विषयात काम करायची इच्छा असे कळविले . महाराष्ट्राच्या एकूण २५ जिल्ह्यातील या संस्था ,संघटना व व्यक्ती आहेत .

हे ही वाचा

रायगड ते गडचिरोली हिंगोलीपर्यंत लोक जोडले गेले आहेत . या सर्व व्यक्ती व संस्थांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार झाला असून प्रत्येकाने आपल्या भागात कामाला सुरुवात केली आहे . महिला व बाल कल्याण विभागाचे राहूल मोरे व विरासीस या दोन अधिकाऱ्यांशी कुलकर्णी यांचे बोलणे झाले. राज्यातील १ ९ ० संस्था एकत्र आल्यात म्हटल्यावर त्यांना खूपच समाधान वाटले . महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्त पवनीत कौर यांना या विषयावर बैठक घेतली व आणखी तपशीलवार सूचना करा , पुढील आठवड्यात लगेच बैठक करून याबाबत नक्की काम सुरू होईल , असे आश्वासन दिले आहे . मंत्री यशोमती ठाकूर यांनाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.महिला व बालकाच्या मदत व पुनर्वसन या कार्यासाठी जालना जिल्ह्यातील दहा सामाजिक संस्थाने पुढाकार घेऊन तालुकानिहाय विधवा व अनाथ मुलांची यादी संकलित केली आहे.याकार्यासाठी जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा चे सहकार्य मिळत आहे. अशी माहिती सहारा संस्था चे अध्यक्ष बिस्मिल्ला .एस.सय्यद यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *