Headlines

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील नाशिकचे योगदान अनन्यसाधारण : प्रा.डॉ.संतोष बोडके

[ad_1]

नाशिक, दिनांक 29 (जिमाका वृत्तसेवा): भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हा अमृत महोत्सव साजरा करतांना स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणींमधून प्रेरणा घेऊन त्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील नाशिक जिल्ह्याचे योगदान या पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील नाशिकचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे नाशिक गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रा.डॉ. संतोष बोडके यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज आयोजित  व्याख्यानात  प्रा. डॉ. संतोष बोडके  बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे, किरण डोळस, वरिष्ठ लिपीक जालिंदर कराळे, लिपीक अतुल सोनवणे, साऊंड रेकॉरर्डीस्ट मनोज अहिरे, तंत्र सहायक साहेबराव जगताप यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. बोडके म्हणाले, स्वातंत्र्य ही निसर्गाकडून मानवाला मिळालेली अद्भूत देणगी असून तिचे जतन मानव पूर्वापार करीत आला आहे. प्राचीन काळापासून स्वातंत्र्य रक्षणासाठी अनेक नरवीरांनी दिलेल्या प्राणांच्या आहुतीची परंपरा अगदी अर्वाचीन काळापर्यंत स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या देशभक्तांपर्यंत येऊन पोहोचते. या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या व तुरंगवास भोगलेल्या, नेतृत्व केलेल्या आणि प्राणार्पण केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे त्यांच्या कार्याचे ऋण फेडणे अशक्य आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सात दशकानंतर नाशिक जिल्ह्याचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान हा विषय इतिहास अभ्यासक, संशोधक व सूज्ञ वाचकांपर्यंत या ग्रंथाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असून हा ग्रंथ मैलाचा दगड ठरणारा असेल, अशी अपेक्षाही प्रा. डॉ. बोडके यांनी यावेळी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीवरील एकमेव संदर्भ ग्रंथ : रणजितसिंह राजपूत

जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत म्हणाले, प्रा. डॉ. बोडके यांचे ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील नाशिक जिल्ह्याचे योगदान’ हे जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीवरील अनेक संदर्भीय ग्रंथ असलेले एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंतराव हुदलीकर (नाशिक), रतनलाल संचेती (कळवण), रामेश्वर पारीख (मनमाड, ता. नांदगाव), शांतीलालजी पिचा (घोटी, ता: इगतपुरी),  शांताबाई छाजेड (नाशिक),  रसिकलाल शहा (अभोणा, ता. कळवण) यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखत व अनुभव कथनातून मार्गदर्शन घेण्यात आले आहे.  तसेच या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवारातील सदस्यांनी छायाचित्रे, हस्तलिखिते, रोजनिशी आदि ग्रंथोपयोगी संदर्भ नमुद केले आहेत. त्याप्रमाणे   नाशिकचा पूर्व इतिहास, जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी, जिल्ह्यातील असहकार चळवळ सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह चळवळ व छोडो भारत आंदोलन यांची सविस्त माहिती संदर्भासह पुस्तकात नमूद केली आहे.

या कार्यक्रमात प्रा.डॉ. संतोष बोडके यांना पॉझिटिव्ह मीडिया पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन माहिती सहाय्यक जयश्री कोल्हे यांनी केले तर आभारप्रदर्शन माहिती अधिकारी अर्चना देशमुख यांनी केले.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *