Headlines

महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आज या राज्यात केंद्राला घेरणार

जयपूर : काँग्रेस आज राजस्थानमध्ये एक विशाल रॅली काढणार आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह सर्व पक्षशासित राज्यांचे मुख्यमंत्री पोहोचणार आहेत. रॅलीत महागाई आणि भाजीपाला, इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किमती यावर केंद्राला घेराव घालण्यात येणार आहे. जयपूरमध्ये ही रॅली होणार आहे. यासाठी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यात सहभागी होणार नसल्याचे समजते.

पुढील वर्षी सात राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा सूर निश्चित केल्याने या रॅलीला पक्षासाठी महत्त्व आहे. यामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे उत्तर प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरात तसेच पंजाबचा समावेश आहे, जिथे पक्ष सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *