Headlines

Congress state president Nana Patole criticized the state government on the issue of inflation msr 87

[ad_1]

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्य सरकारवर महागाईच्या मुद्य्यावरून टीका केली आहे. “जनतेचे सरकार आले आहे असे बॅनर जनता नाही तर, स्वतः भाजपाच लावत आहे ! स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेण्याचा प्रत्यय ईडी सरकारच्या या वागण्यातून येतो.” असं पटोलेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

याचबरोबर, “सद्यस्थितीतील महागाईचे आकडे पाहता सर्वात महागडं राज्य महाराष्ट्र आहे. भाजपा सरकारने महागाईचा कळस गाठला आहे. सद्यस्थितीतील महागाईचे आकडे पाहता सर्वात महागडं राज्य महाराष्ट्र आहे. फडणवीस सरकारच्या काळात मोठ्याप्रमाणात घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे सरकार सामान्य नागरिकांकडून वसुली करत आहे.” असंही म्हणत नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मागील महिन्यात महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक होत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चात काही कार्यकर्ते भेंडी, कारले, कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांची माळ घालून तर हातात तेलाचे पिंप घेऊन महागाईच्या मुद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

सिलिंडर, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झालेली भरमसाट वाढ आणि युवकांना नोकरी मिळत नसल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारविरोधी घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी लावलेले सुरक्षा कठडे पार करून जिल्हाधिकारी कार्यालायत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे उपस्थित पोलिसांशी त्यांची झटापट झाली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *