Headlines

congress president nana patole on prakash ambedkar over vanchit bahujan aghadi congress Alliance ssa 97

[ad_1]

शिवसेनेत ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी एकत्र येत राज्यात नव्या सरकारची स्थापना केली आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी अद्याप कायम आहे. ही महाविकास आघाडी आगामी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीत कायम राहणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी युतीसंदर्भात मोठे विधान केले होते.

“वंचित बाहुजन आघाडीच्या महाराष्ट्र समितीच्या रेखा ठाकूर या अध्यक्षा आहेत. त्यांनी महिन्याभरापूर्वीच काँग्रेस आणि शिवसेनेसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका घेतली होती. युती करायची असेल तर ती काँग्रेस आणि शिवसेनेसोबत करू,” असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता.

हेही वाचा – “ही कोणती हिंदू…”, आई-वडिलांना शिवी देण्यासंदर्भातील वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा चंद्रकांत पाटलांना सवाल; म्हणाले…

यावरती आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “या युतीसाठी आम्ही तयार आहोत. पण, काँग्रेसचा विचार त्यांना मान्य असेल, तर आम्हाला कोणासोबतही युती करण्यास अडचण नाही. काँग्रेसला सेक्युलर मते एकत्र राहावीत. देश वाचवण्यासाठी सेक्युलर विचार घेऊन बरोबर येत असतील तर, त्यांना आमचा विरोध नाही. समोरासमोर येऊन चर्चा करत, पावले टाकली तर योग्य राहिल,” असेही नाना पटोले यांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *