Headlines

cm eknath shinde taunt ajit pawar over ganpati darshan ssa 97

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवानिनित्त अनेक नेत्यांच्या घरी भेटीगाठी दिल्या. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावरून ‘आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा घेऊन जात नाही,’ असे चिमटे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना काढले होते. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत टोले लगावले आहेत.

“मी प्रत्येक ठिकाणी जातो. जनतेला वाटतं आपला मुख्यमंत्री आहे. त्या भावनेने ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागतं. लोक बाकींच्या जवळ जात का नाही, याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कॅमेरा वगैरे माझ्याजवळ नाही आहे. लोक फोटो काढून ते व्हायरल करतात,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विरोधक गणपती दर्शनासाठी फिरत आहेत? यावरती विचारलं असता, “माझ्या दौऱ्यामुळे अनेक लोक फिरत आहेत. मी फिरल्यामुळे त्यांना पुण्य मिळत आहे. ही आपली संस्कृती आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?

“आधीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनाला गेलेलं आठवत नाही. आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा घेऊन जात नाही. जो गणेशभक्त आहे. त्याने अशापद्धतीने देखावा दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या मनात ठेवा ना,” असा सल्लाही अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला होता.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *