Headlines

cm eknath shinde deputy devendra fadnavis will do maharashtra tour together zws 70

[ad_1]

नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. खुद्द फडणवीस यांनीच ही माहिती बुधवारी नागपुरात दिली.

मागच्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. अलीकडेच मराठवाडय़ामध्ये शेतकऱ्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी फडणवीस यांना तुम्ही आणि मुख्यमंत्री संयुक्तपणे दौरा करणार का असे विचारले असता त्यांनीआम्ही काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी  स्वतंत्रपणे महाराष्ट्राचा दौरा करू, असे स्पष्ट  केले.

हेही वाचा >>> “…तेव्हा मोदींनीच सर्वात जास्त विरोध केला होता”, ‘त्या’ प्रकरणावरून शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या

फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे आता  उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही चर्चा सुरू झाली  आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीस दौरा करणार की नंतरअसा चर्चेचा सूर आहे.

राज्यात एवढा मोठा पाऊस पडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किती ठिकाणी जाऊन पाहणी केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यातच गुंग आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली होती, हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा >>>शिवसेनेतील फूट ; आता शपथपत्रावरून वाद ?

आगामी  महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.

आता पार दुष्काळाचे वाटोळे – अजित पवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या वृत्तावर  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. बारामतीमध्ये पवारांच्या घरी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्री—उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले.   आता पार दुष्काळाचे वाटोळे झाले आहे. ओल्या दुष्काळाबाबत मी स्वत: दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकतर सगळ्यांची खरिपाची पिके गेली. रब्बीचीही पिके गेली. शेतकऱ्याला आता काय करावे आणि काय करू  नये हे सुचत नाही. तो इतका चिंतेत आहे की विचारता सोय नाही, असेही अजित पवार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *