Headlines

क्लीन बोल्ड होऊनही Virat Kohli ला मिळाले 3 रन्स, पण कसे? पाहा ICC चा नियम

[ad_1]

मेलबर्न : T20 वर्ल्डकपमध्ये 2022 च्या सुपर 12 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या सामन्याची शेवटची ओव्हर फार चर्चेचा विषय ठरली. पाकिस्तानी फिरकीपटू मोहम्मद नवाजची ओव्हर काही प्रमाणात वादग्रस्त ठरली. या ओव्हरमध्ये दिलेल्या कंबरेच्या वर नो बॉलवर कुठे वाद निर्माण झाला. त्याचवेळी विराट कोहली या ओव्हरमध्ये फ्री हिटवर बोल्ड झाला आणि त्यानंतर घेतलेल्या तीन रन्सवर बरीच चर्चा झालीये.

मुख्य म्हणजे फ्री हिट बॉल टाकला तर तो डेड होतो का हा प्रश्न सर्वत्र होता. यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. अनेक क्रिकेटपटू आणि स्वत: अंपायरिंग सायमन टॉफेल यांनी याबाबत प्रतिक्रिया केलीये. व्यक्त करत क्रिकेटचा खरा नियम सांगितला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार, बॉल डेड नसतो, परंतु वेगवेगळ्या परिस्थितीत रन्स कोणाला मिळावेत यामध्ये फरक असतो.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

आयसीसीच्या नियमांनुसार, फ्री हिटवर फलंदाज कॅच आऊट झाला तर त्याला आऊट दिलं जात नाही आणि रन्स त्याच्या खात्यात जातात. दुसरीकडे, जर फलंदाज प्लेड ऑन असेल, म्हणजेच बॅटला लागून बॉल स्टंपला लागला, तरीही तुम्ही जितके रन्स कराल, तेवढे रन्स फलंदाजाला मिळतात. 

याशिवाय जर चेंडू बॅटला लागला नाही आणि फलंदाज क्लीन बोल्ड झाला, तर अशावेळी बाय मानून रन्स दिले जातात. पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद नवाजच्या फ्री हिट बॉलवर विराट कोहली क्लीन बोल्ड झाल्यावर हा मुद्दा चांगलाच तापला.

ICC च्या कलम 21.19.2 पाहता, कोणताही फलंदाज फ्री हिटवर तीन स्थितीत बाद होऊ शकतो.

पहिला

फ्री हिट बॉलवर फलंदाज रनआऊट झाल्यास त्याला आऊट देण्यात येईल.

दुसरा

जर पुढील फलंदाजाने फिल्डरचा थ्रो जाणूनबुजून रोखला आणि फिल्डींगमध्ये अडथळा आणल्याबद्दल दोषी आढळला, तर त्याला आऊट करार दिला जाऊ शकतो.

तिसऱ्या

जर फलंदाजाने फ्री हिट बॉल बॅटने दोनवेळा मारला किंवा हाताने चेंडू थांबवला तर त्याला आउट दिलं जाऊ शकतं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *