Headlines

चित्रपट-मालिकेतून मिळालेली प्रसिद्धी पाहून अभिनेत्यावर जळायचा बॉलीवूडचा ‘हा’ सुपरस्टार

[ad_1]

Rajesh Khanna and Vijay Arora: प्रसिद्धी ही अशी एक गोष्ट आहे जिनं अनेक कलाकारांच्या आयुष्यात वादळं निर्माण केली आहेत. कधी प्रसिद्धीची हवा ही डोक्यात शिरते तर कधी या प्रसिद्धीवर अनेक जण जळतातही. शेवटी आपण माणूस आहोत आणि याला बॉलीवूड कलाकारही अपवाद ठरले नाहीत. बॉलीवूडला जेव्हा साठ – सत्तरच्या दशकात नवसंजीवनी मिळाली तेव्हा ज्या बॉलीवूड सुपरस्टारनं भारतीय प्रेक्षकांना अक्षरक्षः वेड लावलं होतं. त्याच्या सिनेमांसाठी चाहते, प्रेक्षक तुडूंब गर्दी करायचे. असाही एकही सिनेमा नाही जो प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे हीट ठरला नसेल. (bollywood superstar rajesh khanna used to get jealous over vijay aroras popularity)

आणि हा कलाकार होता राजेश खन्ना (Bollywood Superstar Rajesh Khanna). परंतु तुम्हाला माहिती का राजेश खन्ना यांना इतकी प्रसिद्धी आणि यश मिळूनही मात्र एका समवयस्क कलाकाराच्या प्रसिद्धीवर राजेश खन्ना प्रचंड जळायचे. हा कलाकार आहे विजय अरोरा (Actor Vijay Arora in Ramayana Serial). रामायण ही मालिका आपल्या सर्वांना माहिती आहे. या मालिकेनं भारतीय टेलिव्हिजन दुनियेत इतिहास निर्माण केला आहे. या मलिकेमुळे विजय अरोरा यांनी भुमिका केली होती. मालिकेमुळे विजय यांना मिळालेलं यश पाहून मात्र राजेश खन्ना यांना फारच जेलसी वाटायची. विजय अरोरा यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं पण त्यांना रामायण या टीव्ही सीरियलमधून घराघरात ओळख मिळाली होती. आजही विजय अरोरा यांचं नावं सगळ्यांच्या स्मरणात आहे. (Rajesh Khanna and Vijay Arora Films)

आणखी वाचा – आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले…

विजय अरोरा यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं पण त्यांना रामायण या टीव्ही सीरियलमधून घराघरात ओळख मिळाली. विजय अरोरा यांनी 1973 मध्ये आलेल्या ‘यादों की बारात’ (Yaadon Ki Barat) या चित्रपटातून काम केलं होतं. या चित्रपटात विजय यांच्यासोबत झीनत अमान (Zeenat Aman) मुख्य भूमिकेत होत्या. या चित्रपटात दोघांवर चित्रित केलेले ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ (Chura Liya Hai Tumne Jo Dil Ko) हे गाणे खूप लोकप्रिय झालं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विजय अरोरा यांची लोकप्रियता खूप वाढली होती. विजयची लोकप्रियता पाहून राजेश खन्ना यांनाही विजयच्या प्रसिद्धीमुळे असुरक्षित वाटू लागले होते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना ज्यांना किंग ऑफ रोमान्स म्हटलं जातं त्यांना वाटत होते की विजयने त्याच्याकडून त्याची रोमँटिक हीरोची ओळख हिरावून घेऊ नये. मात्र ‘यादों की बारात’ चित्रपटानंतर विजयच्या नशिबाने त्याला अपेक्षेप्रमाणे साथ दिली नाही. विजयने आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, परंतु असे असूनही ते आपला ठसा उमटवू शकला नाही.

आणखी वाचा – करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

यानंतर 1987 मध्ये जेव्हा विजय यांना रामानंद सागर (Ramanand Sagar Ramayana) यांच्या ‘रामायण’ मालिकेत मेघनादची भूमिका ऑफर करण्यात आली तेव्हा ही भुमिका त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली. ही व्यक्तिरेखा साकारून विजय घरोघरी लोकप्रिय झाले. विजय यांचे 2007 साली निधन झाले.   



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *