Headlines

अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या सुपरहिट चित्रपटाचा पुढचा भाग येतोय; ओळखला का सिनेमा?

[ad_1]

मुंबई : सध्या अनेक सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. बॉलिवूडमध्ये नुकताच रिलीज होवून हिट झालेला एनिमल असेल किंवा सॅम बहादूर असेल. मराठीतील झिम्मा २ असेल किंवा मग पंचक, ओले आले असेल. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवलं. आता अनेक सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता अशा एका सिनेमाची घोषणा झाली ज्या सिनेमाला प्रेक्षकांना अनेक वर्षांपुर्वी डोक्यावर घेतलं होतं. ज्या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक गेले अनेक वर्ष वाट पाहत होते. ज्या सिनेमामुळे गणपतीपुळे हे शहर अजून प्रसिद्ध झालं आता तुम्हाला अंदाज आलाच असेल आम्ही नेमकं कोणत्या सिनेमाबद्दल बोलत आहोत. 

२००४ साली रिलीज झालेला नवरा माझा नवसाचा हा सिनेमा त्या काळात सुपरहिट झालेल्या सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा विनोदी चित्रपट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शिन आणि निर्मिती सचिन पिळगांवकर यांनी  केलं आहे. नोव्हेंबर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटात, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर व विजय पाटकर ह्यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या. मात्र आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. नुकतीच या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची घोषणा अभिनेते जयवंत वाडकर यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. लवकरच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होत आहे.

अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहीलं आहे की, #नवरामाझानवसाचा 2 Shooting start from tomorrow Keep Blessings… अवघ्या काही वेळातच जयवंत वाडकर यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सिनेमात कोणते कलाकार झळकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनेकांनी या पोस्टवर कमेट करत शुभेच्छांचा वर्षावही केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, अशोक सराफ मामा सर असतील पिच्चर सुपरहिट. तर अजून एकाने म्हटलंय, आनंदाची पर्वणी। या वेळेस मकरंद अनासपुरे असतील तर विनोदाच्या दाटकच म्हणजेच निसता दनकाच. तर अजून एकाने लिहीलंय, Will miss रिमा लागू .. प्रदिप पटवर्धन… कुलदिप पवार , विकास समुद्रे. तर अजून एकाने लिहीलंय, पण सगळे वर्जिनल starcast पाहिजे. ड्हुपलिकेट नको. तर अजून एकाने म्हटलय, पहिला चित्रपट तर अजून ही त्याच उत्साहात बघतोअशा अनेक कमेंट चाहते या पोस्टवर करत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *