Headlines

चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी निघालेल्या तरुणीवर काळाचा घाला; रेल्वे प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू

[ad_1]

चुलत बहिणीच्या साखरपुड्यास निघालेल्या कोटा (राजस्थान) येथील एका २५ वर्षीय युवतीची प्रकृती बिघडल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वाघिषा संजय फोतेदार (वय – २५) असे त्या तरुणीचे नाव असून या घटनेनंतर लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा- चार वर्षात एसटी अपघातात १३२ प्रवाशांचा मृत्यू

प्रवासादरम्यान अचानक तब्येत बिघडली

वाघिषा आपल्या चुलत बहिणीच्या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी पुण्याला चालली होती. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरुन कर्नाटका संपर्क क्रांती एक्स्प्रेसने ती पुण्याकडे जात होती. दरम्यान एक्स्प्रेस ही भुसावळ स्थानकावर आल्यानंतर वाघिषा हिची प्रकृती अचानक बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे वाघिषाने आपल्या जवळच्या गोळ्या घेतल्या. तसेच एसी कोच अटेंडंसशी संपर्क साधत तिने तब्येत बिघडल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी तापसणी करुन तिला गोळ्या दिल्या. पण याचा काहीही फायदा झाला नाही. आणखी तब्येत बिघडल्यामुळे तिला भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या.

हेही वाचा- महिला आमदारांकडून ऑनलाइन पैसे मागणारी ‘बंटी-बबली’ची जोडी अटकेत

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप

रेल्वे भुसावळ स्थानकावर आल्यानंतर अधिकारी वाघिषाला खाली उतरवण्यासाठी गेले असता तिची काहीही हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी तिला तातडीने विघ्नहर्ता मल्टीस्पेशल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर वाघिषाच्या पालकांना याबाबत माहिती दिली असून तिचे आईवडील पाचोरा येथे दाखल झाले आहेत. जर लोहमार्ग पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच वाघिषाला भुसावळमधील रुग्णालयात दाखल केले असते तर तिचा जीव वाचला असता. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच वाघिषाचा जीव गेला असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. जर वातानुकूलित डब्यातील व्हीआयपी प्रवाशांची ही परिस्थिती असेल तर सामान्य प्रवाशांचे काय हाल होत असतील असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *