Headlines

T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्डकपमध्ये चोकर्स का म्हणतात?

[ad_1]

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup 2022) नेदरलँड्सने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला आहे. नेदरलँड्सने ग्रुप 1 मधील त्यांच्या शेवटच्या सामना खेळत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 13 धावांनी पराभव करत सामना जिंकला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला तर भारतीय संघ (Team India) थेट उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताला आज अखेरचा ग्रुप-2 मध्ये शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) खेळायचा आहे. मात्र त्याआधीच भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर चोकर्स (chokers) हा शब्द सोशल मीडियावर (Socail Media) ट्रेण्ड होत आहे. (T20 World Cup South African team is called chokers in the World Cup)

नेदरलँड्सने 13 धावांनी पराभूत करत दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेदरलँडचा हा विजय पाकिस्तान आणि बांगलादेशसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन संघांमधील सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणार आहे. यासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतही आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्सचा डाग मिटवू शकलेले नाहीत असे म्हटले आहे.

चोकर्स (chokers) म्हणजे काय?

हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं पण वर्ल्डकपमध्ये जिंकून हरणाऱ्या संघाला ‘चोकर्स’ म्हणतात. चोकर्स ही संकल्पना दक्षिण आफ्रिकेच्या संघाविषयी सातत्याने वापरली जाते. दक्षिण आफ्रिकेचा संघ हा मोठ्या स्पर्धांमध्ये, विशेषत: वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करूनही महत्त्वाच्या प्रसंगी पराभूत होतो. त्यामुळेच दिग्गज खेळाडू असूनही दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अनेक संधी मिळूनही आजपर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.

त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सातत्याने चोकर्स असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियातील वर्ल्डकप स्पर्धेतच्या नेदरलँड्विरुद्धच्या सामन्यातही  दक्षिण आफ्रिकेला चोकर्सचा टॅग पुसता आलेला नाही. 

1992 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात चमकदार कामगिरी करून सर्वांनाच चकित केले होते. उपांत्य फेरीतही संघ मजबूत स्थितीत होता. पण पावसामुळे नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावांचे लक्ष्य होते. त्यामुळे इंग्लडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. 

1999 मध्ये ऑस्ट्रेलियाने  प्रथम फलंदाजी करताना 213 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 198 धावांत नऊ विकेट गमावल्या. लान्स क्लुजनरने आक्रमक फलंदाजी करत धावसंख्या बरोबरीत आणली. शेवटच्या विकेटवर एक धाव हवी होती. दक्षिण आफ्रिकेची 10 विकेट पडली आणि सामना बरोबरीत सुटला. नेट रनरेट कमी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या मागे पडला.

दरम्यान, आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये महत्त्वाच्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कायमच निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यानंतरही दक्षिण आफ्रिकेला पुन्हा चोकर्स म्हटले जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *