Headlines

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना आणखीन एक धक्का; राज्यपालांना पाठवलं पत्र, राज्यपाल कोश्यारींनी ‘ती’ मागणी केली मान्य | cm eknath shinde letter to governor bhagat singh koshyari about withdrawal of 12 MLAs list by MVM government scsg 91

[ad_1]

जून महिन्यापासून बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरु असतानाच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिंदेंनी नवा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडीने पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे राज्यपालांनी ही मागणी मान्य करुन ती यादी मागे घेतल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. हा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील सदस्य पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना महाविकास आघाडीकडून पाठवण्यात आलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी मागे घेण्यासाठी पत्र लिहिलं. महाविकास आघाडीने राज्यपाल कोश्यारींना २० नावं पाठवली होती. हीच यादी मागे घेण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली. राज्यपालांनी या मागणीनुसार ही यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपाकडून राज्यपालांना नवी यादी दिली जाणार आहे. म्हणजेच विधानपरिषदेमधील राज्यपाल नियुक्त १२ आमदार कोण असतील हे आता शिंदे गट आणि भाजपा ठरवणार आहे.

शिंदे सरकारकडून लवकरच राज्यपालांना नवी यादी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी पाठवलेलं पत्र आणि त्यानुसार घेण्यात आलेला यादी मागे घेण्याचा निर्णय हा शिंदेंनी ठाकरेंना दिलेला आणखीन एक धक्का आहे. यापूर्वी महाविकास आघाडीने सरकारने अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये दोनदा राज्यपालांकडे यादी दिली होती. मात्र राज्यपाल कोश्यारींनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता. राज्यपालांनी ही यादी मान्य केली नव्हती. तांत्रिक बाबी किंवा कायदेशीर बाबी दाखवत राज्यपालांनी यादी स्वीकारण्यास नकार दिला होता.

महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यामध्ये या यादीवरुन बराच वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण अगदी न्यायालयामध्येही गेलं होतं. सध्या नवीन नावं भाजपा आणि शिंदे गटाकडून दिली जाणारी यादी राज्यपाल कोश्यारी मान्य करतील अशी अपेक्षा शिंदे गटाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *