Headlines

तुमच्या फोनमध्ये 5G सर्विस मिळतेय?, या सोप्या स्टेप्सने चेक करा

[ad_1]

नवी दिल्लीः भारतात 5G Service लाँच करण्यात आली आहे. देशातील १३ प्रमुख शहरात फास्ट इंटरनेटचा फायदा यूजर्सला मिळत आहे. देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेल एकूण ८ शहरात 5G सर्विस देत आहे. परंतु, 5G कनेक्टिविटीचा फायदा घेण्यासाठी यूजर्सकडे 5G सपोर्टेड स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. 5G स्मार्टफोन असूनही काही फोनमध्ये ही सेवा सुरू होत नाही. त्यामुळे सर्वात आधी चेक करा की, तुमच्या परिसरात ५जी सर्विस उपलब्ध आहे की, नाही. या ठिकाणी तुम्हाला काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये 5G चालू करावे लागेल. फोनमध्ये 5G इनेबल म्हणजेच चालू केल्यानंतर स्क्रीनवर 5G सिग्नल दिसेल. आतापर्यंत या ठिकाणी 4G सिग्नल दिसत होता. याचा अर्थ तुम्ही 5G सर्विस कव्हरेजच्या परिसरात आहात. जर ५जी सर्विस लिहिलेले दिसत नसेल तर तुम्ही कनेक्टिविटी चेक करू शकता.

Airtel Thanks ॲपवरून माहिती होईल
5G सर्विस चेक करण्यासाठी एअरटेलने एक सपोर्टेड टूल सुद्धा ऑफर केले आहे. एअरटेल यूजर्स या टूलचा वापर करून माहिती करू शकतो की, त्यांच्या परिसरात 5G सर्विस आहे की नाही. यासाठी यूजर्सला सर्वात आधी Airtel Thanks ॲप डाउनलोड करावे लागेल. जर तुमच्या फोनमध्ये हे ॲप आधीपासून डाउनलोड असेल तर याचे लेटेस्ट व्हर्जन तुमच्या फोनमध्ये असायला हवे. आता या ॲपला ओपन करा नंतर ऑप्शन चेक करा.

वाचा: Vodafone-Idea च्या या प्लानसमोर Jio-Airtel फेल, प्लानमध्ये ५० GB मोफत डेटासह Sony Liv चे सबस्क्रिप्शन

अशी चेक करा 5G सर्विस
एअरटेल थँक्स ॲप ओपन केल्यानंतर एक ऑप्शन दिसेल. यावरून तुम्हाला तुमचा स्मार्टफोन 5G इनेबल आहे की, नाही हे कळू शकेल. या ऑप्शनवर टॅप करून तुम्हाला ऑटोमॅटिकली सर्व माहिती मिळू शकते. जर तुम्हाला “You are in a 5G city” असे लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या परिसरात ५जी सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही ५जी इंटरनेट चालू करू शकता.

वाचाः Amazon ची खेळी ! फक्त ५९९ रुपयांमध्ये वर्षभर देणार बेनेफिट्स, Netflix- Hotstar चे टेन्शन वाढणार

वाचाः धमाकेदार ऑफर ! ७ हजारात खरेदी करा Realme चा जबरदस्त स्मार्टफोन, सेल १३ नोव्हेंबर पर्यंत

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *