Headlines

chandrashekhar bawankule criticized mahavikas aghadi leaders spb 94

[ad_1]

वेदान्त फॉक्सकॉन, एअरबससारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे उद्योग शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे बाहेर जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे, तर याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून महाविकास आघाडी सरकावर टीकास्र सोडले आहे. ते नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा – Thackeray vs Shinde: “…म्हणून मला हे सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणता येणार नाही”; ठाकरे, शिंदेंचा उल्लेख करत उज्ज्वल निकमांचं विधान

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“माहिती अधिकाराखाली माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल, की जे प्रकल्प राज्याबाहेर जात आहे, ते केवळ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जात आहे. १८ महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्यामुळे, तत्कालिन उद्योगमंत्र्यांनी उपसमितीच्या बैठकी न घेतल्याने आणि राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण न झाल्याने हे सर्व प्रकल्प त्यांच्याच काळात परत गेले आहे”, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

हेही वाचा – “तुम्ही काहीच चिंता करू नका, एक कडवट हिंदुत्ववादी माणूस गृहमंत्री, त्यामुळे…”, देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत नितेश राणेंचं वक्तव्य

“आदित्य ठाकरेंनी वेदान्तचा प्रकल्प गेल्यानंतर पुण्यात आंदोलन केले होते. मात्र, माहिती अधिकारात अशी माहिती पुढे आली की या जागेचं वाटपच झालं नव्हतं. ‘खोटं बोला पण रेटून बोला”, असा हा प्रकार आहे. सरकार गेल्याने आणि यापुढे आपले सरकार कधीही येणार नाही, हे माहिती असल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे शेवटची घरघर जी लागली आहे, ती थांबवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची रोज पळापळ होते आहे, काँग्रेसची हालत खराब झाली आहे. त्यामुळे तिघे मिळून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अडीच वर्षा त्यांनी काहीच काम केलं नाही. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे सरकार काम करते आहे, तर त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही ते म्हणाले. तसेच यापुढे महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला, तर आम्ही हा खोटारडेपणा हाणून पाडू”, असा इशाराही त्यांनी दिला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *