Headlines

Chandrakant Patal criticizes Ajit Pawar on fund allocation

[ad_1]

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना आघाडीतील आमदारांनाच अधिक निधी दिला जात होता. पुणे जिल्ह्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जवळच्या आमदारांना अधिक दिलेला निधी आम्ही निम्मा कमी केला आहे. निधी वाटपावरून राजकारण करणार नाही. सर्व आमदारांना समान निधी देण्याचे धोरण स्वीकारले आहे, असे मत पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची घेतली भेट, प्रकृतीबाबत दिली माहिती; म्हणाले…

येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना मंत्री पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामकाज पद्धतीवर टीकेचे झोड उठवली. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री असताना पवार यांनी पुणे जिल्ह्यात स्वतःसाठी ८० कोटी. दिलीप वळसे पाटील, अण्णा भरणे यांना प्रत्येकी ४० कोटी रुपये इतका निधी दिला. अन्य आमदारांना दहा ते बारा कोटी निधी दिला होता. निधीमध्ये समानता आणण्यासाठी ज्यांना अधिक निधी मिळाला तो मी निम्मा कमी केला आहे. निधी वाटपात समान असावे ही यामागची भूमिका आहे.

दोन्ही मुख्यमंत्र्यांनाही एकत्र यावे

कोल्हापुरात महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील राज्यपालांची समन्वय बैठक झाली. याविषयी विचारणा केली असता मंत्री पाटील म्हणाले, सीमा प्रश्नासारखे न्यायालयीन वाद वगळता उभय राज्यांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही राज्यपालांची ही सकारात्मक सुरुवात म्हणावी लागेल. पुढील टप्प्यात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही एकत्र यावे लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- ज्या घरात वाढलो तेच घर उद्ध्वस्त करणं ही बेईमानी – अजित पवार

गुजरात जिंकणार

गुजरात निवडणुकीविषयी ते म्हणाले, एखाद्या राज्याची निवडणूक लागली की भाजपा युद्ध समजून प्रचार कार्याला लागतो. ती जनसंघापासूनची रणनीती आहे. भाजप एक कुटुंब होऊन लढत असल्याने यश मिळते. यापूर्वी अन्य राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही गेलो होतो. गुजरातमध्येही जाऊन प्रचार करून पुन्हा सत्ता राखू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *