Headlines

Chanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात

[ad_1]

Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे, त्यातून जेव्हा जेव्हा नीतिमत्तेचा विषय येतो तेव्हा चाणक्य नीतीचाच विषय येतो. अनेकजण नीतिमत्तेनुसार वागण्याच प्रयत्न करतात. आचार्य चाणक्य यांनी स्त्री आणि पुरुषांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार स्त्री-पुरुषांनी कधीही आपले रहस्य कोणाकडेही उघड करू नये, अन्यथा भविष्यात समस्या उद्भवू शकतात. (Chanakya Niti keep this secrets in life and avoid speaking in public or anyone know reason)

आचार्य चाणक्य यांनी जीवन, समाज, देश, राज्य आणि जग यांच्यातील संबंध कसे चांगले ठेवावेत याविषयी नीतिशास्त्राची तत्त्वे दिली आहेत. चाणक्याच्या नीती शास्त्राची तत्त्वे आता सर्वात समर्पक आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्याशी संबंधित आचार्य चाणक्यांची तत्त्वे जीवनात आत्मसात करणे थोडे कठीण आहे, परंतु जो कोणी त्याच्याशी संबंधित आहे किंवा ज्याने ते जीवनात (life rules and lesson) आणले आहे त्याचे कल्याण नक्कीच होते. चाणक्याच्या नीतिशास्त्राच्या तत्त्वांमध्ये अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या तत्त्वांचाही समावेश आहे जे आजही खूप लोकप्रिय आहेत. चाणक्‍याने जीवनाशी निगडित अनेक नियम आपल्या नीतिशास्त्रात सांगितले आहेत. अशा परिस्थितीत चाणक्याच्या तत्त्वांवर खूप विचार करून ते जीवनात आत्मसात करण्याची गरज आहे.  

जाणून घेऊया स्त्री आणि पुरूषांनी कोणत्या गोष्टी लपवल्या पाहिजेत – 

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, लग्नानंतर पुरुष आणि स्त्रीमध्ये भांडण (marriage relationships) होत असतील तर त्यांनी ती भांडणं आपापसात सोडवली पाहिजेत. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्याबद्दल कोणालाही सांगू नका, असे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी वाढू शकतात. 

2. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमचे कोणत्याही बाबतीत काही नुकसान असेल तर ते कधीही उघड करू नका. कारण इतर लोकं नुकसानाबद्दल दुःख व्यक्त करतील परंतु प्रत्यक्षात मात्र तुमच्या दुःखांबद्दल आनंदी होतील.

3. चाणक्य नीतीनुसार, जर कोणी तुमचा अपमान केला असेल किंवा तुम्हाला दुखावले असेल तर ते कोणालाही सांगू नका. कारण ज्या व्यक्तीला तुम्ही ही गोष्ट सांगणार असाल तर ती व्यक्ती (life secrets) तुमच्याबद्दल वेगळा विचार करू शकते. 

4. चाणक्य सांगतात की, तुम्ही तुमच्या घराचे रहस्य कोणालाही सांगू नका. असे केल्याने तुम्ही फसवणुकीचे बळी होऊ शकता. 

5. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाला त्यांच्या पैशांचे रहस्य सांगू नये, असे केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *