पहिली व सहावीत मराठी सक्तीची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षांपासून मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी घेतला आढावा
मुंबई, दि .११ राज्यात २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांपासून पहिली व सहावी या वर्गासाठी सर्व माध्यमांच्या शाळांतून मराठी भाषा विषय शिकविणे सक्तिचे केले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य करणे हा कायदा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने दोन्ही सभागृहांनी…