Headlines

अहंकारामुळे एका झटक्यात उद्ध्वस्त झालं करिअर; आज एका चित्रपटासाठी तळमळतोय ‘हा’ प्रसिद्ध दिग्दर्शक

[ad_1]

मुंबई : बॉलीवूड इमड्सट्रीमध्ये यश मिळवणं हे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. पण, जर यश मिळालं तर ते सांभाळणं आणखी कठीण काम आहे. तुम्ही एक छोटीशी चूक करता आणि तुमचं करिअर धोक्यात येतं. संजय दत्त किंवा सलमान खानबद्दल बोलायचं झालं तर, आपल्या छोट्याशा चुकीमुळे त्यांना अनेक वर्षे केवळ कोर्टकचेऱ्याच्या फेऱ्या तर मारल्या लागल्याच पण चाहत्यांच्या रोषालाही  सामोरे जावं लागलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

पण आज आपण बॉलिवूडच्या एका निर्माता-दिग्दर्शकाबद्दल बोलणार आहोत, ज्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की, तो नेहमीच खूप घमंडी होता. मिळालेल्या याशामुळे अभिनेत्याच्या डोक्यात हवा होती. ज्यामुळे कालांतराने एका झटक्यात त्याची कारकीर्द उद्ध्वस्त झाली. तो ना लग्न करू शकला ना तो व्यवस्थित सेटल होऊ शकला. आता त्याला एका चित्रपट मिळत नाहीये.  

तुम्हाला संजय दत्तची टाडा कोर्टातील केस आठवत असेल, ज्यामुळे त्याला बरीच वर्षे तुरुंगात राहावं लागलं होतं. तुम्हाला सलमान खानचे हिट अँड रन प्रकरणही आठवत असेल, ज्यामुळे त्याचे करिअर धोक्यात आलं होतं. सलमान आणि संजय दत्तप्रमाणेच असे डझनभर कलाकार होते ज्यांच्या छोट्या-छोट्या चुकांमुळे त्यांची कारकीर्द अंधाराच्या गर्तेत गेली. आज आपण एकेकाळी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साजिद खानबद्दल बोलत आहोत. साजिद खान हा दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खानचा भाऊ आहे. आज हा अभिनेता एक-एका चित्रपटासाठी आसुसलेला आहे.

2006 मध्ये पहिला चित्रपट दिग्दर्शित केला
साजिद खानच्या करिअरची सुरुवात ‘मैं हूं जासूस’ या टीव्ही शोचा होस्ट म्हणून झाली, त्यानंतर 2006 मध्ये तो त्याची बहीण फराह खानप्रमाणे दिग्दर्शक बनला. त्याच्या दिग्दर्शनाखाली बनलेला पहिला चित्रपट ‘डरना भी जरूरी है’ होता. त्यानंतर त्याने एकामागून एक अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, मात्र सतत मिळणाऱ्या यश आणि प्रसिद्धीमुळे त्याच्या डोक्यात हवा गेली असं म्हणतात.

त्याचवेळी त्याचं नाव जॅकलिन फर्नांडिससोबतही जोडलं गेलं, पण हे नातं फार काळ टिकलं नाही आणि 2013 मध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या सामोर येऊ लागल्या. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा पडझड 2018 मध्ये आला, जेव्हा एकापाठोपाठ एक अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर MeToo चे आरोप केले. त्याचीच सहाय्यक सलोनी चोप्राने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. एवढंच नाही तर शर्लिन चोप्रा, मंदाना करीमी, डिंपल पॉल, आहाना कुमरा, सिमरन सुरी, करिश्मा उपाध्याय, रेचेल व्हाइट, करिश्मा खान आणि जिया खान यांनीही त्याच्यावर MeToo चे गंभीर आरोप केलं आहेत.

जेव्हा चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता
इथून त्याच्या करिअरचा आलेख खालच्या दिशेने जाऊ लागला. MeToo वादामुळे त्याला रातोरात ‘हाऊसफुल 4’ चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. त्याला काढून टाकल्यानंतर फरहाद सामजी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *