Headlines

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच स्तरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. त्यात आता धोनीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत धोनीचा (Ms dhoni birthday) वाढदिवस उत्साहात साजरा होताना दिसत आहे. 

भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा वाढदिवस इंग्लंडमध्ये खास पद्धतीने साजरा करण्यात आला. धोनीने आनंदाने केक कापत मित्र-परीवारासोबत हा वाढदिवस साजरा केला. धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आणि फोटो साक्षीने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

व्हिडिओमध्ये धोनीने छानस जॅकेट घातलेलं दिसतंय. मागे माही असे गोल्डन बर्थडेच्या फुग्यांमध्ये लिहण्यात आले आहे. तसेच सर्वत्र छान लायटिंग देखील करण्यात आली आहे. धोनीसाठी एक अप्रतिम केक तयार करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये धोनी मेणबत्ती विझवून दोन्ही हातांनी केक कापताना दिसतो. या व्हिडिओला मागे इंग्लिश संगीतही वाजत आहे. 

‘या’ खेळाडूची उपस्थिती

धोनीच्या सर्वांत जवळचे खेळाडू म्हणून रैना आणि जाडेजाकडे बघितले जाते. मात्र या दोघांऐवजी टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने या वाढदिवसाला हजेरी लावली होती. साक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ऋषभ पंत दिसला होता. पंत सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे एक कसोटी सामना खेळण्यात आला. त्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आजपासून तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *