Headlines

CAA , NRC , NPR रद्द करा – भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी

बार्शी-( प्रतिनिधी )-  भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोलापूर जिल्हा कौन्सिलच्या वतिने दिनांक 3 जून 2020 रोजी एनआरसी, सीएए, एनपीआर ला देशव्यापी विरोध दिना निमित्ताने हा विरोध करण्यात आला.  यावेळी कार्यकत्यांनी घरातूनच हातात पोस्टर घेत हा विरोध दर्शवला.

मा. पंतप्रधान, मा.मुख्यमंत्री व मा. जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हा यांना मेलव्दारे निवेदन पाठवण्यात आले.  निवेदनात म्हटले आहे, शांततापूर्वक सीएए, एनपीआरला विरोध करणार्‍या  कार्यकर्त्यांवर  देशात देशद्रोहाचे गुन्हे दाखल  केले जात आहेत, कोरोना लाॅकडाउन काळात जनतेला दिलासा देण्याऐवजी विरेाधी आवाजाला, आंदोलनाला  दाबून बंद करू पाहत आहे.  या आंदोलनात  पूढील मागण्या करण्यात आल्या आहेत, सीएए विरोधी आंदोलक  कार्यकर्त्यांना  जेलमधून सोडा, लोकशा ही वादी  शक्तींचा आवाज दाबण्या ऐवजी प्रवासी श्रमिक, मेहनतकश जनतेच्या प्रशांनावर  तात्काळ लक्ष द्या, दिल्ली येथील दंग्यातील खर्‍या  गुन्हेगारांना अटक करा, सर्व राजकीय कैद्यांची सुटका करा, सीएए, एनआरसी, एनपीआर, यूएपीए तातडीने रद्द करा.तसेच पुण्यात 2 जून 2014 रोजी मारलेल्या मोहसीन शेख  यास न्याय द्या, मारेकर्‍यावर  तातडीने कार्यवाही करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर भाकप राज्य कौन्सिल कार्य सदस्य काॅम्रेड तानाजी ठोंबरे, काॅम्रेड प्रविण मस्तुद यांच्या सहया आहेत.  काॅम्रेड शौकत शेख, काॅम्रेड ए.बी. कुलकर्णी, काॅम्रेड अनिरूध्द नकाते, काॅम्रेड लक्ष्मण घाडगे, काॅम्रेड पवन आहिरे आदींनी विरोध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *