Headlines

‘बुलबुलचा रेप सीन खूप…’, ‘ॲनिमल’ मधील न्यूड सीनच्या चित्रीकरणाविषयी सांगताना तृप्ती डिमरीनं सांगितली खरी परिस्थिती

[ad_1]

Tripti Dimri : कोणताही कलाकार असो जेव्हा तो एखाद्या कलाकारासोबत इंटिमेट सीन देणार असतो. तेव्हा त्या कलाकाराला त्याच्या आजुबाजूचं सेटवरचं वातावरण ही सिक्योर फील व्हाव असं असायला पाहिजे. त्या पैकी एक म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी आहे. जिचा ‘ॲनिमल’ या चित्रपटातील न्यूड सीन हा चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात तिनं जेव्हा इंटिमेट सीन दिला तेव्हा तिला देखील असचं वातावरण हवं होतं. त्याविषयी बोलताना तृप्ती डिमरीनं सांगितलं की ‘बुलबुलमधील रेप सीन हा खूप ट्रॉमेटिक होता.’

तृप्ती डिमरूनं ‘इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम’ ला दिलेल्या मुलाखतीत या सीक्वेंसविषयी चर्चा केली आहे. त्याविषयी बोलताना ती म्हणाली की ‘हे शूट करण्याआधी खूप चर्चा झाल्या. ज्या दिवशी त्यांनी चित्रपटासाठी मला विचारलं, तेव्हाच संदीप सरांनी मला स्पष्ट केलं होतं की, अरे, हा तो सीन आहे, ज्याला मला शूट करायचे आहे. मला हा सीन असा हवा आहे. मी तुला वचन देतो की हा सीन अश्लील नसेल, याला योग्य पद्धतीनं शूट करण्यात येईल. पण मला तू कर्म्फट देखील माहित हवं. त्यामुळे जर तू कर्म्फटेबल नसशील तर त्याला योग्य पद्धतीनं करायचा आणखी काही वेगळा विचार करू. पण तू मला ही गोष्ट प्रामाणिकपणे सांगायला हवी.’

तृप्ती पुढे म्हणाली की तिला संदीप रेड्डी वांगा यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी खूप वेळ घेतला आणि शेवटी तिनं होकार दिला. त्यावेळी बुलबुलच्या सीनविषयी बोलाताना तृप्ती पुढे म्हणाली, जेव्हा तुम्ही कोणत्या प्रोजेक्टला साइन करता, ‘तेव्हा तुम्ही हा विचार करतात की तुम्ही काय करत आहात. बुलबुलमध्ये रेप सीन खूप वाईट होता, पण हा नव्हता. तो स्क्रीनवर दाखवण्यासाठी मला स्वत:ला मागे सोडावं लागलं. जेव्हा तुम्ही कोणता चित्रपट साइन करता, तेव्हा तुम्ही या गोष्टीची काळजी करता की तुम्ही 100 टक्के द्याल.’

 हेही वाचा : खायला मिळावं म्हणून पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या नीना गुप्ता; बॉयफ्रेंड म्हणायचा, ‘तू नोकर व्हायला आलीस…’

तृप्तीनं सांगितलं की अॅनिमलच्या सेटवर ती सगळ्यांसोबत पोहोचली होती. तिथे तिला खूप कर्म्फटेबल केलं होतं. तर जेव्हा हा सीन शूट करण्यात आला तेव्हा सेटला बंद करण्यात आलं होतं, असं तिनं सांगितलं. ‘रणबीरनं या गोष्टीची काळजी घेतली होती की ती कर्म्फटेबल राहिल. खरंतर त्याआधी मी घाबरले होते, द्विधावस्तेत होते. पण त्यानं मला खूप कर्म्फटेबल केलं.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *