Headlines

मानधनाच्या बाबतीतही ‘झुकेगा नही साला…’ ‘पुष्पा 2’ साठी Allu Arjun च्या Fees ची आकडेवारी पाहिली का?

[ad_1]

Allu Arjun Fees For Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) संपूर्ण भारतात ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटामुळे ओळखू लागले. या चित्रपटानं अल्लू अर्जुनची लोकप्रियता ही प्रचंड वाढली. अल्लू अर्जुन सध्या त्याचा ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुननं ज्या मानधनाची मागणी केली त्यामुळे तो चर्चेत आला आहे. आता अल्लू अर्जुन हा तेलगू चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. 

Siasat.com नं दिलेल्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुननं सगळ्यात आधी चित्रपटासाठी मानधन म्हणून 150 कोटींची मागणी केली होती. मात्र, त्यासाठी निर्माते तयार नव्हते आणि त्यांनी 125 कोटी रुपये मानधन देण्यास स्विकृती दिल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जुननं हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. तर ‘पुष्पा 2’ हा ‘बाहुबली 2’ आणि KGF 2 यांचे रेकॉर्ड मोडणार असे म्हटले जात आहे. 

अल्लू अर्जुननं काही दिवसांपूर्वीच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. खरंतर टीसीरिजच्या ट्विटर अकाऊंटवरून अल्लू अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत निर्माते भूषण कुमार, प्रणय रेड्डी वांगा, सह-निर्माता शिव चानना आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा दिसत होते. हा चित्रपट बिग बजेट असणार असे म्हटले जात आहे. इतकंच काय तर अल्लू अर्जुन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाशिवाय टीसीरिजच्या ‘स्पिरिट’ या चित्रपटातही अल्लू अर्जुन दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास देखील दिसणार आहे. 

अल्लू अर्जुननं दिला होता ‘जवान’ला नकार

दरम्यान, काही दिवसांपासून चर्चा होती की अल्लू अर्जुननं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाला नकार दिला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. मात्र, अल्लू अर्जुन हा त्याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यानं त्यानं चित्रपटाला नकार दिला. 

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आणि फहाद फासिल (Fahadh Faasil) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात सगळ्यांची लाडकी अभिनेत्री साई पल्लवी देखील दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, या बातमीवर अजून कोणी दुजोरा दिलेला नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *